पुणे विभागात निर्भया पथकाकडून १०६ जणांवर गुन्हे दाखल

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन 

पुणे विभागातील सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, पुणे ग्रामीण या पाच जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांत निर्भया पथकाने चांगले काम केले आहे. यामध्ये ६२ हजार १६५ लोकांवर कारवाई करण्यात आली आहे. तर १०६ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सुमारे ५८ हजारजणांचे त्यांच्या पालकांसमोर समुपदेशन करण्यात आले आहे. निर्भया पथकाच्या या मोहिमेमुळे महाविद्यालये तसे रस्त्यावरील छेडछाडीच्या प्रकारात घट झाली आहे, अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्रचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी सांगली येथे पत्रकार परिषदेत दिली.

[amazon_link asins=’B00DRLASZ6,B00KNN4N4I’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’673387f7-b0f0-11e8-8d42-2d11f79fb346′]

गणेशोत्सवात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती देताना नांगरे-पाटील म्हणाले, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवण्यात येत आहे. काही ठिकाणी अपुरे सीसीटीव्ही असल्याने सर्व शहरावर नजर ठेवणे शक्य होत नाही. त्यामुळे सीसीटीव्ही नसतील त्या ठिकाणी पोलिसांची वाहने थांबवण्यात येणार आहेत. त्याबाबतचा नवीन आदेश सांगलीचे पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांना काढला असून त्याची लवकरच सांगली जिल्ह्यात अंमलबजावणी केली जाणार असल्याचेही नांगरे-पाटील यांनी सांगितले.

निर्भया पथकांच्या यशस्वी कामगिरीची महिती देताना नांगरे-पाटील यांनी सांगितले की, निर्भया पथकांच्या या कामगिरीमुळे आता मुली व महिलांमध्येही आत्मविश्वास निर्माण झाला असून युवतीही निर्भयपणे तक्रारी देण्यासाठी पुढे येऊ लागल्या आहेत. त्यामुळे निर्भया पथकाचा उद्देश सफल झाला आहे. त्याशिवाय निर्भया पथकाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जनजागृती मोहीम सुरू असून त्यालाही पाचही जिल्ह्यातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. पाच जिल्ह्यांत गेल्या दोन वर्षां ९६ टोळ्यांवर मोक्कांतर्गत कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये ६३६ गुन्हेगारांचा समावेश आहे. तर ५५ प्रमाणे ७७२ व ५६ प्रमाणे १६७ जणांना हद्दपार करण्यात आले आहे.

हद्दपारीचे १६७ प्रस्ताव मंजुर –

प्रांताधिकाऱ्यांकडे ७७७ हद्दपारीचे प्रस्ताव पाठवण्यात आले आहेत. त्यातील केवळ १६७ प्रस्तावच मंजुर करण्यात आले आहेत. अन्य प्रस्तावांवर सुनावणी सुरू आहे. पाच जिल्ह्यातून स्थानबद्धतेसाठी ८४ प्रस्ताव पाठवण्यात आले होते. त्यामध्ये १७ जणांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. केवळ सांगली जिल्ह्यात ११ जणांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. सांगली जिल्हा पोलिस दलाने स्थानबद्धता, मोक्का, हद्दपारी यामध्ये चांगली कामगिरी केली आहे असेही नांगरे-पाटील यांनी यावेळी सांगितले.