ममता बॅनर्जींना जबरदस्त ‘झटका’ ! भाजपा प्रवेशासाठी उत्सुक असलेल्या १०७ जणांची यादी ‘सार्वजनिक’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या भारतात दक्षिणेकडील राजकाराणात मोठ्या प्रमाणात चढउतार सरु आहेत. कर्नाटक आणि गोवा दोन्ही राज्यात फोडाफोडीचे राजकारण सुरु आहे. तर सत्ता स्थापनेसाठी भाजप पूर्णपणे जोर लावत आहेत. त्यामुळे रोज नवनवीन गोष्टी कानावर पडत आहेत. त्यात भाजप नेता मुकूल रॉय यांनी काँग्रेस आणि माकपचे आमदार आपल्या संपर्कात असल्याचे सांगितलं आहे. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का मिळाला आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तब्बल १०७ आमदार भाजपमध्ये येण्यास इच्छुक आहेत, असं रॉय यांनी म्हटलं आहे. रॉय यांनी दिलेली ही माहिती त्यांनी अधिक ठामपणे सांगितली आहेत. यावेळी त्यांनी एक फाईल पुढे करत यात सर्व आमदारांची नावे आणि त्यांच्या पक्षांची नावे आहेत, असं त्यांनी सांगितलं होते.

रॉय यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. कारण भाजप सध्या अनेक राज्यांत स्वतःची सत्ता स्थापन करू इच्छित आहे. त्यात कर्नाटक राज्यातील काँग्रेसच्या १३ आमदारांनी राजीनामे दिले आहेत. हे आमदार भाजपच्या गळाला लागल्याचे चित्र दिसत आहे. त्यानंतर आता पश्चिम बंगाल ला भाजपने लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळेच तृणमूल, सीपीएम आणि काँग्रेसचे मिळून १०७ आमदार लवकरच भाजपमध्ये येणार असल्याचा दावा भाजप नेते रॉय यांनी केला आहे. त्यामुळे काँग्रेस आणि तृणमूल मध्ये असलेली अस्वस्थता समोर येत आहे. रॉय यांनी केलेला दावा जर खरा असेल तर नक्कीच ममतांच्या तृणमूल सरकारवर दबाव वाढणार आहे.

दरम्यान, रॉय यांनी हा खळबळजनक दावा केला असला तरी त्यांनी मात्र आमदारांच्या नावांची यादी जाहीर केली नाही किंवा ती माध्यमांनाही दिलेली नाही. यावेळी रॉय यांनी सांगताना असेही नमूद केले की ऑगस्ट महिन्यापासून हे आमदार भाजपमध्ये प्रवेश करण्यास सुरुवात करतील. मात्र यांच्या या वक्तव्यावर किती विश्वास ठेवावा हाही एक प्रश्नच आहे. कारण यापूर्वीही भाजपने अनेकदा विरोधी पक्षातील नेते आणि भाजपा प्रवेशाचे दावे केले आहेत. मात्र तेव्हा भाजपने सांगितलेल्या आकड्यांइतके आमदार किंवा नेते भाजपमध्ये गेलेच नव्हते.

 

आरोग्यविषयक वृत्त 

विज्ञान आणि आयुर्वेद सांगतं ‘या’ पदार्थाने करा जेवणाची सुरूवात, ‘हे’ फायदे होतात

गुलाबाच्या फुलाचे अशाप्रकारे सेवन ‘या’ आजारांसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच

‘हे’ उपाय केल्यास ‘गॅस्ट्रिक ट्रबल’मध्ये त्वरित मिळेल आराम, औषध घेण्याची गरज नाही

दात मजबुत आणि पांढरे शुभ्र राहण्यासाठी ‘या’ ८ पदार्थांचं सेवन नक्‍की टाळा

मोड आलेल्या कडधान्याचं सेवन केल्यास होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

बाहेरच्या फळांच्या ज्यूसमुळं आरोग्य बिघडतं, ‘ही’ 5 प्रमुख कारणं

कच्चे ‘अंडे’ खा आणि ‘हे’ ४ फायदे मिळावा

वजन कमी करण्याचे ‘हे’ १५ रामबाण उपाय, घाम देखील येणार नाही

स्तनाच्या कर्करोगाची ‘ही’ ६ लक्षणं, जाणवल्यास ‘हे’ ४ उपाय तात्काळ करा, जाणून घ्या

 

Loading...
You might also like