खळबळजनक ! अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांच्या चंद्रपूरात ‘सरकारी’ रूग्णवाहिका ‘108’ मधून दारूची ‘तस्करी’

चंद्रपूर : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये १०८ रुग्णवाहिकेतून दारूची तस्करी करण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे या जिल्ह्यात दारु बंदी करण्यात आली असताना देखील अशा प्रकारे दारुची तस्करी होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून सहा लाखांची दारू जप्त केली आहे. ही कारवाई शहरातील रामनगर पोलिसांनी बाबुपेठ भागात केली. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मागील चार वर्षापासून दारूबंदी लागू करण्यात आली आहे. आरोग्यदृष्या संकटात सापडलेल्या रुग्णांना तात्काळ रुग्णालयात नेण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्रात १०८ रुग्णवाहिका सुरु केली. मात्र, याच रुग्णवाहिकेतून दारूची तस्करी होत असल्याने आणि राज्याच्या अर्थमंत्र्यांच्या जिल्ह्यातच असा धक्कादायक प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दारु बंदी लागू केल्यानंतर जिल्ह्यामध्ये दारूची तस्करी करणाऱ्या अनेकांना अटक करण्यात आली आहे.

शहर पोलिसांनी यवतमाळ येथील राहुल वानखेडे या रुग्णवाहिका चालकाला अटक केली असून रुग्णवाहिका आणि दारु असा एकूण १६ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संकटात अडकलेल्या रुग्णांना तात्काळ मदत मिळावी यासाठी रुग्णावहिकेचे जाळे राज्यभर पसरवण्यात आले आहे. मात्र, याच १०८ रुग्णवाहिकेतून दारुची अवैधरित्या तस्करी करण्यात येत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणातील दोन आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like