10 वी, 12 वी बोर्ड परीक्षेसंदर्भात येत्या 2 दिवसांत जाहीर होणार मार्गदर्शक सूचना

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे येत्या दोन दिवसामध्ये बोर्डाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून सांगण्यात आले आहे. तर एप्रिल व मे या महिन्यात परीक्षेचे आयोजन करताना इयत्ता १० वी ची बोर्डाची परीक्षा २९ एप्रिल ते २० मे या कालावधीत तसेच १२ वी बोर्डाची परीक्षा २३ एप्रिल ते २१ मे या कालावधीत सार्वत्रिक पद्धतीने आणि व मंजूर आराखड्यानुसार आयोजित करण्यात आली आहे.

तर, राज्यात कोरोना संसर्ग अधिकच वाढत आहे. याकारणाने परीक्षा सुरक्षित व सुरळीतपणे तसेच निश्चित काळात पार पाडण्याच्या दृष्टीने मंडळ स्तरावर विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच १० वी प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी परीक्षा १२ एप्रिल ते २८ एप्रिल कालावधीत तर १२ वी प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी परीक्षा ५ एप्रिल ते २२ एप्रिल या कालावधीचे आयोजन करण्यात आले आहे. याबरोबर विविध समाज माध्यम, प्रसारमाध्यमात १० वी आणि १२ वी परीक्षेत संदर्भात विविध बातम्या, माहिती द्यावी. असे यावेळी बोर्डाकडून सांगण्यात आले आहे.