१९९० नंतरची १० वी, १२ वी ची ‘मार्कशीट’ हरविल्यास ‘नो-टेन्शन’, ‘या’ वेबसाईटवर मिळणार घरबसल्या ‘मार्कशीट’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – अनेकांचे 10 वी, 12 वीचे मार्कशीट कोणत्या ना कोणत्या कारणांनी गहाळ, होतात किंवा खराब होतात. परंतू अशाना आता आपले मार्कशीट किेंवा प्रमाणपत्र लवकरच मिळण्याची सुविधा महाराष्ट्र बोर्डाने दिली आहे. त्यामुळे आता तुम्हाला तुमचे 10 वी 12 वी चे प्रमाणपत्र आणि मार्कशीट पुन्हा मिळण्याची संधी आहे. ते ही घर बसल्या.

महाराष्ट्र बोर्डाने यासाठी एक वेबसाईट उपलब्ध करुन दिली आहे. ज्याद्वारे तुम्ही तुमचे 10 वी,12 वीचे मार्कशीट आणि प्रमाण पत्र घरबसल्या मिळवू शकतात. यासाठी तुम्हाला www.boardmarksheet.maharashtra.gov.in या वेबसाइटला भेट द्यावी लागेल. यावर तुम्हाला तुमच्या मार्कशीटची आणि प्रमाणपत्राची pdf उपलब्ध होईल.

असे मिळवा 10 वी, 12 वीचे मार्कशीट –
सर्वात आधी वर दिलेल्या वेबसाइटवर जा, त्यात तु्म्हाला लॉगीन करण्यास सांगण्यात येईल. तुम्ही तुमची माहिती भरून लॉगिन केल्यानंतर तुम्हाला तुमचे 10 वी आणि 12 वी चे सीट नंबर त्यात टाकावा लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे मार्कशीट आणि प्रमाण पत्र उपल्बध होईल. परंतू यासाठी तुम्हाला तुमचा सीट नंबर माहित असणे आवश्यक आहे. याशिवाय तुम्हाला मार्कशीट किंवा प्रमाण पत्र मिळणार नाही.
परंतू ज्यांच्याकडे त्यांचे सीट नंबर उपलब्ध आहेत त्यांना एका किल्कवर ही सुविधा मिळणार आहे.

1990 सालापासूनच्या मार्कशीट उपलब्ध –
1990 पासूनच्या मार्कशीट आणि प्रमाणपत्र महाराष्ट्र बोर्डने तुम्हाला उपलब्ध करुन दिले आहेत. याचा फायदा सर्वांनाच होऊ शकतो. आवश्यक वेळी आपल्याकडे मार्कशीट उपलब्ध नसल्यास तुम्हाला ते एका क्लिकवर उपलब्ध होऊ शकते.

आरोग्यविषयक वृत्त –

‘त्वचा’ होईल तजेलदार आणि वाढेल ‘डोळ्यां’ची क्षमता, दररोज ‘हे’ करा

पावसाळ्यात ‘मेकअप’ करताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या

तुमच्या ‘आयब्रो’ चा रंग अधिक डार्क करण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स

‘गुळ’ या आजारांवर ठेवतो नियंत्रण

द्रुतगती महामार्गावर भिषण अपघातात तीन ठार, एक गंभीर जखमी

माजी खासदार राजीव सातव यांचे मराठवाडा प्रदेश कार्यकारिणी च्या अध्यक्ष पदी नाव चर्चेत

अर्थसंकल्प सादर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ