१० वी आणि १२ वीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने १० वी आणि १२ वीच्या पुरवणी परीक्षेचे वेळापत्र बुधवारी (दि.१२) जाहीर केले. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत पुरवणी परिक्षा घेण्यात येणार आहे.

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता १० वी) लेखी परीक्षा १७ ते ३० जुलै दरम्यान घेण्यात येणार आहे. तर उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) लेखी परीक्षा १७ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान घेण्यात येणार आहे. तसेच १२ वीच्या व्यवसाय अभ्यासक्रमाची लेखी परीक्षा १७ जुलै ते ३१ जुलै दरम्यान घेण्यात येणार आहे. या परीक्षांचे वेळापत्रक mahahsscboard.maharashtra.gov.in या बेवसाईटर उपलब्ध करून देण्यात आले आहे.

यंदाच्या वर्षी १० वीचा निकाल कमी लागला आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात आली होती. शाळांनी दिलेले अंतर्गत गुण ग्राह्य धरले नसल्यामुळे निकालाची टक्केवारी घसरली. या निकालामुळे स्टेट बोर्डाचे विध्यार्थी मागे पडतील अशी चिंता व्यक्त करण्यात येत होती. यावर केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे विनोद तावडे यांनी स्पष्ट केले आहे.

आरोग्य विषयक वृत्त – 

‘या’ कारणामुळे सकाळी उठल्यावर मोबाईलचा वापर शक्यतो टाळाच

यामुळे कारणांमुळें वाढत महिलांचं वजन

डासांमुळे होणाऱ्या या आजारांना ‘घरगुती’ पद्धतीने घाला आळा.

कॅन्सरच्या मोठ्या सामन्यानंतर सोनाली घेतेय आता हा ‘उपचार’