विद्यार्थ्याच्या खिशात कॉपी ऐवजी सापडले ‘हे’ पत्र

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात सध्या बारावी आणि दहावीच्या परिक्षा सुरु आहेत. अनेक ठिकाणी कॉप्यांचा सुळसुळाट झाला असून काही ठिकाणी तर चक्क व्हाट्सअपवर पेपरच व्हायरल झाल्याच्या बातम्या येत आहेत. त्यामुळे बोर्डाचे भरारी पथक सर्वत्र तपासणी करीत आहेत. इंग्रजी पेपरला सर्वाधिक कॉप्या होतात, हे लक्षात घेऊन भरारी पथक तपासणी करीत असताना औरंगाबादला एक वेगळाच प्रकार समोर आला.

संतापजनक ! अल्पवयीन विद्यार्थीनीवर ४ कंडक्टरचा सामुहिक बलात्कार 

एका दहावीच्या विद्यार्थ्याची तपासणी करताना त्याच्या खिशात काही कागदे आढळली. अगोदर त्यांना वाटले की ही कॉपी आहे. त्यांनी ते नीट पाहिल्यावर ती कॉपी नसून चक्क लव्ह लेटर असल्याचे त्याच्या लक्षात आले आणि हे पथकही उडालेच.

हा प्रकार औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील तेलवाडी येथे मंगळवारी घडला. इथल्या दहावीच्या परीक्षा केंद्रावर भरारी पथक दाखल झाले होते. इंग्रजी विषयाचा पेपर सुरु होता. यावेळी विद्यार्थ्यांची तपासणी केली असता, त्यात एका मुलाच्या खिशात लव्हलेटर सापडले.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like