धक्कादायक ! १० वीच्या परीक्षेत झाला ‘पास’, पण आयुष्याच्या परीक्षेत ‘नापास’

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन – दहावीत नापास होण्याच्या भीतीने दोन दिवस आधी एका मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कोल्हापूर शहरातील आर. के. नगरमध्ये समोर आली. मात्र शनिवारी निकाल लागला आणि तो उत्तीर्ण झाला. मात्र या घटनेने त्याच्या कुटुंबियांचा आनंदच हरपला.

प्रणव सुनील जरग असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.

प्रणव जरग हा देशभक्त रत्नाप्पा कुंभार विद्यालयाचा विद्यार्थी होता. त्याने दहावीची परीक्षा दिली होती. ताे आई वडीलांना सांगत होता, की मी इंग्रजीत नापास होणार. परंतु आई वडील त्याला धीर देत होते. तू नापास झालास तरी चालेल, पुन्हा प्रयत्न कर असे आई वडिल सांगत होते. तरी तो नैराश्यात गेला. त्यामुळे गुरुवारी सायंकाळी कोणीही घरात नसताना त्याने गळफास घेतला.

१० वीत मिळाले ४२ टक्के गुण

प्रणवने १० वीत नापास होण्याच्या भीतीने आत्महत्या केली. मात्र शनिवारी निकाल लागला आणि तो उत्तीर्ण झाला. त्याला १० वीत ४२ टक्के गुण मिळाले. ही गोष्ट त्याच्या मित्रांनी आई वडिलांना सांगितली.

Loading...
You might also like