Coronavirus : ‘कोरोना’शी लढण्यासाठी इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यानं दिला PM मोदींना ‘हा’ संदेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतामध्ये दररोज कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढत आहे. या संकटापासून वाचण्यासाठी सरकार बरीच पावले उचलत आहे, त्याचबरोबर मोठमोठे सेलिब्रिटीही मदतीसाठी आपला हात पुढे करत आहेत. याच दरम्यान, दहावीच्या एका विद्यार्थ्याने कौतुक करत पंतप्रधानांना एक पत्र लिहून कोरोना विषाणूविरूद्ध लढण्याचा सल्ला दिला आहे. यामुळे त्या विद्यार्थ्याचे सगळे कौतुक करत आहे

पंतप्रधान मोदींना पत्र लिहून सांगितली ही गोष्ट
दिवसेंदिवस कोरोना वाढण्याचा धोका पाहून अभिनव कुमार शर्मा याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून लढण्यासाठी सल्ला दिला. त्याने लिहिले की, ‘या परिस्थितीत आर्थिक संकटाला मात करण्यासाठी केंद्र सरकारने देशातील सर्व धार्मिक संस्थांना देवाच्या नावावर जमा होणाऱ्या पैशांपैकी 80% रक्कम सरकारच्या निधीमध्ये दान करावे, असा आदेश दिला पाहिजे. सर्व संस्थांना ते बंधनकारक असले पाहिजे.’

अभिनव याने आपल्या पत्रात असेही लिहिले आहे की, ‘मला पूर्ण विश्वास आहे की जर त्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी हा पैसा खर्च झाला तर नक्कीच ते खूप आनंद होईल. आपण सर्व लोकांमध्ये मानवतेच्या दिशेने अधिक विश्वास वाढवू.’ अभिनवने पुढे लिहिले की, ‘आमच्या पंतप्रधानांनी सांगितले आहे की, केवळ सामाजिक अंतरच आपल्याला वाचवू शकते. अशा परिस्थितीत, मला आशा आहे की, हे लॉकडाऊन थोडेसे पुढे जाऊ शकते परंतु या काळात चांगल्या व्यवस्था असाव्यात जेणेकरून कोणालाही अडचणीत येऊ नये.’

देहरादून येथे राहणारा अभिनव कुमार शर्मा अवघ्या 15 वर्षांचा आहे आणि तो दहावीत शिकत आहे. त्याचे आई-वडील हेल्थकेअरमध्येही काम करतात. तो म्हणतो की, चीनमधील मृत्यू पासून ते कोरोना साथीच्या प्रादुर्भावावर तो बारीक लक्ष ठेवून होता.