शिरुर तालुक्यातील ३३ विद्यालयाचा 10 वी चा निकाल 100 %

शिक्रापुर : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे सह नऊ विभागीय मंडळांमार्फत घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा (SSC Result 2020) निकाल जाहीर झाला आहे. राज्यात एकूण 15 लाख 84 हजार 264 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती, त्यातून 15 लाख 1 हजार 105 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. त्यामुळे राज्याचा निकाल 95.30 टक्के लागला आहे.

शिरूर तालुक्यातील शाळांचा सरासरी निकाल ९७ . ८१ टक्के लागला असून दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील शेकडा निकालात सातत्य राखले आहे . शिरूर तालुक्यात एकूण ७८ माध्यमिक विद्यालये असून त्यापैकी ३३ माध्यमिक विद्यालयांचा निकाल १००℅ लागला आहे,तालुक्यात एकूण ६०३७ विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्यापैकी ५९०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले .१०० टक्के निकाल लागलेली विद्यालयात प्रामुख्याने मंगल मूर्ती विद्याधाम. रांजणगाव गणपती, श्री. संभाजीराव पलांडे प्रगती हायस्कूल.मुखई, श्री.गुरुदेव दत्त विद्यालय .सविंदणे,न्यू. इंग्लिश स्कूल. इनामगाव, विद्या विकास मंदिर .निमगांव म्हा, गुरुनाथ विद्यालय .वडनेर, श्रीमती बबईताई टाकळकर आश्रम शाळा . निमगाव म्हा.,कालीका माता विद्यालय वाघाळे ,अभिनव विद्यालय सरदवाडी ,तात्यासाहेब सोनावणे विद्यालय. निर्वी,इंग्लिश मिडी. स्कूल शिरूर न्यू,इंग्लिश स्कूल . उरळगाव, न्यू. इंग्लिश स्कूल . पिंपळ सुटी ,शरदचंद्रजी पवार विघालय. वढू ,हनुमान विद्यालय .निमगाव भोगी, न्यू. इग्लिश स्कूल भांबर्डे, छत्रपती संभाजीराजे विद्यालय जातेगांव, जय मल्हार माध्य विद्या मोराची चिंचोली ,शरदचंद्रजी माध्य . विद्यालय. चिंचणी, रसिकलाल धारिवाल इंग्लिश मिडी. स्कूल शिरूर ,संभाजीराव भुजबळ विद्यालय. तळेगाव ढमढेरे, घनोबा विद्यालय .धानोरे, आबासाहेब पाचंगे विद्या .ढोकसांगवी ,भैरवनाथ माध्य . विद्या . कोयाळी ,पांडुरंग अण्णा थोरात विद्या. आमदाबाद, कै. रा . गे. पलांडे आश्रम शाळा मुखई ,पद्ममणी इंग्लिश मिडी. स्कूल पाबळ, जीवन विकास माध्य. विद्या . शिरूर, विजयमाला विद्या मंदिर . शिरूर, जिजामाता इंग्लिश मिडी. स्कूल. सणसवाडी, आर. एम.डी . सिंहगड स्कूल. कोंढापुरी, बालाजी माध्य . विद्यालय. शिरूर, अजिंक्यतारा इंग्लिश मिडी . स्कूल शिक्रापूर इत्यादी समावेश आहे.तर वर्षीच्या निकालाचे वैशिष्टय म्हणजे तालुक्यात विशेष प्राविण श्रेणीसह २५१५ विद्यार्थी , प्रथम श्रेणीत २११६ विद्यार्थी , द्वितीय श्रेणीत १०९२, पास श्रेणीत १८२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गतवर्षीच्या तुलनेत विद्यार्थी गुणवत्तेत वाढ झाली असल्याने निकाला वरून स्पष्ट दिसत आहे अशी माहिती गटशिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे यांनी दिली .