राज्यातील इयत्ता 10 वी चा निकाल उद्या दुपारी 1 वाजता होणार जाहीर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. सर्वांना उत्सुकता लागून राहिलेल्या 10 वीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी (दि. 29) म्हणजेच उद्या जाहीर होणार आहे. उद्या दुपारी 1 वाजता हा निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. मंडळांकडून पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण अशा नऊ विभागात मार्च 2020 मध्ये परीक्षा घेण्यात आली होती.


दहावीचा निकाल कसा पाहू शकाल ?
दहावीचा निकाल पाहण्यासाठी www.maharesult.nic.in, www.sscresult.mkcl.org, www.maharashtraeducation.com या वेबसाईटवर निकाल पाहू शकता. तर www.maharesult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्याच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल. तसेच www.mahasscboard.in या संकेतस्थळावर एकत्रित निकाल उपलब्ध केला जाईल.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दहावीचा निकाल लागण्यास उशीर झाला असला तरी 29 जुलै रोजी म्हणजेच उद्या हा निकाल जाहीर केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना संकेतस्थळावर ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना गुणपडताळणीसाठी 30 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत तर छायांकितप्रती साठी 30 जुलै ते 18 ऑगस्टपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे, असे राज्य मंडळाकडून सांगण्यात आले आहे.