धक्कादायक ! महिलेवर 11 जणांनी केला सामुहिक बलात्कार, 8 आरोपी निघाले कोरोनाबाधित

रांचीः पोलीसनामा ऑनलआइन – एका 35 वर्षीय महिलेवर 11 जणांनी सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना झारखंडमधील पाकूड येथे घडली आहे. घटनेनंतर पिडित महिला दोन दिवस बेशुध्दावस्थेत होती. या प्रकरणी महिलने पोलिसात तक्रार दिल्यानंतर अवघ्या 10 तासात पोलिसांनी सर्व 11 आरोपींना अटक केली. पीडित महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपींमध्ये महिलेच्या नातेवाईकांचाही समावेश आहे. अटकेनंतर या आरोपींची कोरोना तपासणी केली असता त्यात 8 जण कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

एसपी मणिलाल मंडल यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडित महिला संध्याकाळी शौचास जाताना वाटेवर काही तरुण मद्यप्राशन करत बसले होते. महिलेला एकटे पाहून यातील काही आरोपींनी तिचे अपहरण करून तिला दूरवर झाडीत नेऊन तिच्यावर सामुहिक बलात्कार केला. त्यानंतर आरोपींनी आपल्या आणखी काही नातेवाईकांनाही बोलावून घेतले. त्यानंतर रात्रभर या महिलेवर बलात्कार केला. सकाळी हे सर्व आरोपी या महिलेला तशाच निपचित अवस्थेत सोडून पसार झाले. पिडित महिला तिथून सकाळी कशीबशी घरी आली. घटनेनंतर कुटुंबीयांनी महिलेवर उपचार केले. प्रकृतीत थोडी सुधारणा झाल्यावर या महिलेने मुफस्सिल पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तिथे त्यांनी आपबीती सुनावली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना बेड्या ठोकल्या. सुरुवातीला 10 आरोपींना अटक केली होती. एक अल्पवयीन आरोपी फरार झाला होता. मात्र त्यानंतर त्यालाही ताब्यात घेतले आहे.