Pimpri News : पिंपरी-चिंचवडमध्ये एकाच दिवशी 11 सराईत गुन्हेगारांवर मोठी कारवाई

पिंपरीः पोलीसनामा ऑनलाईन – पिंपरी चिंचवड पोलिसांनी शहरातील 11 सराईत गुन्हेगारांना एकाच दिवशी तडीपार केले आहे. या गुन्हेगारांना आजपासून शुक्रवारी (दि. 26) 2 वर्षांसाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. यात भोसरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील 3, चाकण, आळंदी, दिघी ठाण्यातील प्रत्येकी 2 चिंचवड, एमआयडीसी भोसरी ठाण्यातील प्रत्येकी एका गुन्हेगाराचा समावेश आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी यंदा आतापर्यंत 24 गुन्हेगारांना तडीपार केले आहे. तर गेल्या वर्षी 72 गुन्हेगारांना तडीपार केले होते.

भोसरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शकील कासीम शेख (वय 24 रा. कासारवाडी), अमोल शांताराम नितोने (वय 20, रा. भोसरी), रवींद्र उर्फ गोट्या बन्सीलाल भालेराव (वय 22, रा. भोसरी), चाकण ठाण्यातील ओंकार मछिंद्र झगडे (वय 24, रा. चाकण), रोहन महेंद्र घोगरे (वय 22, रा. चाकण), आळंदी ठाण्यातील गौरव धर्मराज भूमकर (वय 23, रा. चिंबळी, ता खेड), दिगंबर उर्फ डिंग्या विठ्ठल कदम (वय 30, रा. आळंदी), दिघी ठाण्यातील राहुल एकनाथ धनवडे (वय 21, रा. चऱ्होली बु.), महेंद्र रवींद्र वाघमारे (वय 45, रा. बोपखेल), चिंचवड ठाण्यातील वीरेंद्र उर्फ बेंद्या भोलेनाथ सोनी (वय 20, रा. वाल्हेकरवाडी), एमआयडीसी भोसरी मधील 1 आरोपी अशी तडीपार केलेल्या आरोपींची नावे आहेत.