आपल्या सासूवर इतके प्रेम की 11 सूनांनी बांधले ‘सासूचे मंदिर’, रोज करतात पूजा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सासू- सुनेच नातं म्हंटल कि, म्यानातल्या दोन तलवारी आठवतात. मात्र छत्तीसगडमधील बिलासपूर येथून अनोखं चित्र समोर आलं आहे. सासू- सुनांच्या नात्यातला हा सुंदर मिलाप पाहून प्रत्येकालाच आश्चर्य वाटेल. बिलासपुरात राहणाऱ्या 11 सुनांनी त्यांच्या सासूचं चक्क मंदिर बांधल आहे. तसेच, तिला सोन्याच्या दागिन्यांनी सजवून दररोज पूजाही केली जाते. या सर्व सून महिन्यातून एकदा मंदिरासमोर भजन-कीर्तन करतात. बिलासपूर जिल्हा मुख्यालयापासून 20 किमी अंतरावर बिलासपूर-कोरबा रोडवर रतनपूर गाव आहे, येथे 2010 ला महामाया देवीचे मंदिर बनविले गेले आहे. हे मंदिर गीता देवी नावाच्या महिलेचे आहे. जे तिच्या 11 सुनांनी बनविले आहे.

दरम्यान, रतनपूर गावात सेवानिवृत्त शिक्षक शिवप्रसाद तांबोळी यांचे संयुक्त कुटुंब आहे, हे त्यांच्या पत्नी गीता देवीचे मंदिर आहे, या कुटुंबात 39 सदस्य आहेत, गीता देवीचे 2010 मध्ये निधन झाले, आजही त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या मृत्यूचे दुःख आहे. लोकांचे म्हणणे आहे कि, जेव्हा ती जिवंत होती तेव्हा तिने आपल्या सर्व सूनांवर मुलींप्रमाणेच खूप प्रेम केले. सासूच्या मृत्यूनंतर सर्व सूनांनी त्यांच्या आठवणीत मंदिर बांधले आणि दररोज त्यांची पूजा करण्याचे ठरविले.

तांबोळी कुटुंबातील सर्व सूना शिक्षित
गीता देवीला तीन सूना आहेत आणि त्याच्या जावा देखील आहेत, या सर्वांनी सांगितले की, गीता देवी त्यांच्यावर सूनांप्रमाणे नाही तर बहिणीप्रमाणे प्रेम करत. सर्व कामे व सूना व जावांच्या सल्ल्यानुसार करत, म्ह्णून सर्वजण त्यांची आठवण काढतात. तांबोळी कुटुंबातील सर्व सूना शिक्षित आहेत. सर्व पोस्ट ग्रॅज्युएट आहेत आणि ते घरातील व्यवसायाचा हिशेब ठेवण्यास मदत करतात.