विषारी औषध खाल्ल्याने ११ कुत्री, कावळे मृत्युमुखी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विषारी औषध खाल्ल्याने खेड तालुक्यातील दावडी येथील सुमारे ११ पाळीव व मोकाट कुत्री, कावळे मृत्युमुखी पडल्याची घटना घडली.

मांजरेवाडी येथे अज्ञात व्यक्तीने खाण्याच्या पदार्थांमध्ये विषारी औषध टाकल्याने ते खाऊन विषबाधा होऊन कुत्री मृत्युमुखी पडलाचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. पाळीव व मोकाट कुत्र्यांचे मृतदेह गाव व परिसरात पडले आहेत. त्यातील अनेक कुत्री पाळीव होती. बबनराव मांजरे, जयसिंग मांजरे तसेच अनेक शेतकऱ्यांची घरची पाळीव कुत्री मृत्युमुखी पडली आहे.

कुत्र्यांना विषबाधा झाल्याने ठिकठिकाणी त्यांचे मृतदेह पडल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. त्यामध्ये काही कावळे ही दगावले आहे. त्यात पावसाळ्याचे दिवस असल्याने रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. साथीचे आजार पसरण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. अनेक शेतकऱ्यांना शेतात काम करताना या दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.

असे ठेवा ‘मेंदू’वर नियंत्रण, जाणून घ्या ‘हे’ सोपे उपाय

आंब्याची पानेही आरोग्यासाठी आहेत ‘फायदेशीर’

पावसाळ्यात खा भरपूर ‘जीवनसत्व’ असलेला आरोग्यदायी ‘राजमा’

स्तनाचा कॅन्सर, डायबेटीजचा धोका कमी करण्यासाठी ‘हे’ सेवन करा

रोग प्रतिकारशक्तीवर परिणामकारक ठरतात ‘या’ गोष्टी

दररोज ४ काजू, ८ मनुका सेवन करा, झटपट बरे होतील ‘हे’ आजार