Loksabha : राज्यातील ११ विद्यमान खासदारांना पक्षांनी नाकारली उमेदवारी

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाने विद्यमान खासदारांच्या कामाचे प्रगती पुस्तक तयार केले. विद्यमान खासदारांनी केलेल्या कामामुळे त्यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. तर काहींची उमेदवारी नाकारण्यात आली आहे. तसेच काहींच्या उमेदवारीला विरोध असल्याने तिकीट नाकारण्यात आले. राज्यातील ११ विद्यमान खासदारांना त्या त्या पक्षांनी उमेदवारी नाकारली आहे. यामध्ये सर्वाधिक भाजपच्या सात खासदारांचा समावेश आहे. भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांच्या उमेदवारीला शिवसेनेकडून विरोध असल्याने भाजपने पुन्हा संधी नाकारली आहे.

भाजपने पहिल्या यादीत सोमय्या यांची उमेदवारी जाहीर केली नाही. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भाजपने २३ पैकी सात खासदारांना उमेदवारी नाकारली आहे. पक्षांतर्गत असंतोष, नाराजी, गटबाजी यातून विद्यमान खासदारांचा पत्ता कट करण्यात आला आहे. तर १६ विद्यमान खासदारांना पुन्हा निवडणूक रिंगणात उतरवले आहे. काँग्रेसने राजीव सातव यांच्या ऐवजी सुभाष वानखेडे यांना उमेदवारी दिली आहे.

भाजपने पहिल्या यादीत सोमय्या यांची उमेदवारी जाहीर केली नव्हती. तेव्हाच त्यांच्या उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. भाजपने २३ पैकी सात खासदारांना उमेदवारी नाकारली आहे. पक्षांतर्गत असंतोष, नाराजी, गटबाजी यातून विद्यमान खासदारांचा पत्ता कापला गेला आहे. पक्षाने १६ खासदारांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने यावेळी खासदार राजीव सातव यांच्या ऐवजी सुभाष वानखेडे यांना उमेदवारी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दोन विद्यमान खासदारांना उमेदवारी नाकारली आहे. विजयसिंह मोहीते पाटील आणि मधुकर कुकडे या दोन खासदारांना राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारली आहे. मागील वर्षी भंडारा-गोंदिया लोकसभेच्या पोटनिवडणुकीत विजयी झालेल्या कुकडेंना राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारली आहे.

शिवसेनेने १८ विद्यमान खासदारांपैकी एका खासदाराचा पत्ता कट केला आहे. शिवसेनेने उस्मानाबादचे विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांना उमेदवारी नाकारली आहे. भाजपने हरिश्चंद्र चव्हाण, दिलीप गांधी, सुनील गायकवाड, ए.टी. पाटील, किरीट सोमय्या, शरद बनसोडे, अनिल शिरोळे या खासदारांना उमेदवारी नाकारली आहे.

You might also like