वारिस पठाणांचं मुंडकं छाटणार्‍याला 11 लाखाचं ‘बक्षीस’, मुस्लिम संघटनेची ‘घोषणा’

हैद्राबाद : वृत्तसंस्था – ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एमआयएमआयएम) चे प्रवक्ते वारिस पठाण यांनी गुरूवारी नागरिकत्व संशोधन कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व रजिस्टर (एनआरसी) च्या विरोधातील सभेत वादग्रस्त वक्तव्य केले होते. ज्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. विरोधी पक्षांसह आता मुस्लिम संघटनाही पठाण यांच्या विरोधात उभ्या ठाकल्या आहेत.

मुजफ्फरपुर येथील अल्पसंख्यक सामाजिक संघटना हक-ए-हिंदुस्तान मोर्चाने वारिस पठाण यांचे शीर कलम करणार्‍याला 11 लाख रूपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. हक-ए-हिंदुस्तान मोर्चाच्या संयोजक तमन्ना हाशमी यांनी वारिस पठाण यांच्या वक्तव्याचा निषेध करून ते देशविरोधी असल्याचे म्हटले आहे. वारिस पठाण यांनी आपल्या वक्तव्यात म्हटले होते की, ते म्हणतात की आम्ही महिलांना पुढे केले आहे, परंतु लक्षात ठेवा आतापर्यंत केवळ वाघिणीच बाहेर आल्यात तर तुम्हाला घाम फुटला आहे. यावरून तुम्ही समजू शकता की, आम्ही सर्व बाहेर आलो तर काय होईल. आम्ही 15 करोड आहोत परंतु, 100 करोडवर भारी पडू, हे लक्षात ठेवा. याच वक्तव्यावरून वारिस पठाण यांच्यावर एफआयआर दाखल झाली आहे.

वारिस पठाण यांच्या विरूद्ध भारतीय दंड विधान कलम 117, 153 (दंगल पसरवण्यासाठी चिथावणी) आणि कलम 153ए (दोन समुदायात द्वेष पसरवणे) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हक-ए-हिंदुस्तान मोर्चा संघटनेच्या संयोजक तमन्ना हाशमी यांनी पठाण यांचे वक्तव्य देश विरोधी असल्याचे म्हटले आहे. तर काही ठिकाणी पठाण यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलनही करण्यात आले. पठाण यांच्या वक्तव्याचा सर्व निषेध होत आहे.

You might also like