११ नोव्हेंबर !  शेतकऱ्यांचा संयम सुटला तर २०१३  सरखा उद्रेक होईल : राजू शेट्टी 

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – ऊस दराचा प्रश्न सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांची दिल्लीत जाण्याची हिंमत नाही की त्यांना दिल्लीत किंमत नाही हे कळत नाही. असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, खासदार राजू शेट्टी यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, माध्यमांशी बोलतांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष, खासदार राजू शेट्टी म्हंटले कि, “अर्जुनाला जसा माशाचा डोळा दिसत होता, तसे मला आता फक्त उसाला दर हा एकच प्रश्न दिसत आहे. यासाठी मी कुणालाही अंगावर घेण्यास तयार आहे. जर येत्या काही दिवसात हा तिढा सुटला नाही, तर ११ नोव्हेंबर रोजी ऊस पट्ट्यात चक्काजाम आंदोलन आणि कडकडीत बंद पाळला जाईल”. इतकेच नव्हे तर  शेतकऱ्यांचा संयम सुटला तर २०१३  सरखा उद्रेक होईल. याला सर्वस्वी सरकार जबाबदार असेल.आज आंदोलने होत असताना कारखानदार गप्प आहेत, यामागे सरकारच आहे. बेकायदेशीर वागणाऱ्या कारखान्यांच्या कृत्याला सरकार पाठीशी घालत आहे. सत्तेतील काही लोकांना नेहमी रक्तपात हवा आहे. असेही राजू शेट्टी यांनी म्हंटले आहे.
इतकेच नव्हे तर, शेतकरी प्रश्नांबाबत पुढेपुढे मिरवणारे चंद्रकांत पाटील आता कुठे आहेत ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. चंद्रकांत पाटील यांच्याशी आता चर्चा करणार नाहीत.
विशेष म्हणजे सत्तेत असलेले आणि मंत्री सदाभाऊ खोतही आंदोलन करत आहेत हा मोठा विनोद आहे. ऊस दराच्या आंदोलनावावरून आम्ही दोघे एकत्र येऊ हे शक्य होणार नाही, मुख्यमंत्र्यानी अन्य कोणीही माणूस चर्चेसाठी नेमावा अशी मागणीही मी केली आहे. असे राजू शेट्टी यांनी म्हंटले आहे.