राज्यातील 11 पोलीस अधिकारी ‘केंद्रीय गृहमंत्री पदका’ने ‘सन्मानित’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – केंद्रीय गृहमंत्री पदाने देशातील ९३ तपास अधिकाऱ्यांना गौरवण्यात आले आहे, या तपास अधिकाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील ११ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. आपल्या कारकर्दित उत्कृष्ठ तपास व शोधकार्यासाठी हा पुरस्कार देऊन उत्तम कार्य निभावणाऱ्या अधिकाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्रालयाकडून गौरवण्यात येते. गेल्यावर्षीपासून या पदकाची सुरुवात करण्यात आली आहे. गुन्हे तपासातील कौशल्याचा सन्मान व्हावा आणि तपासाचा दर्जा उंचावण्यासाठी हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो.

केंद्रीय गृहमंत्री पदक विजेत्यांमध्ये सीबीआयचे १५ तपास अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तसेच यात महाराष्ट्र पोलीस दलातील ११ अधिकारी. उत्तर प्रदेश पोलीस दलातून १० अधिकारी, केरळ पोलीस दलातील ९ अधिकारी, मध्यप्रदेश पोलीस दलातील ८ अधिकारी, कर्नाटक व दिल्ली पोलीस दलातील ६ पोलीस अधिकारी यांचा समावेश आहे. याशिवाय सन्मानित करण्यात येणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये १३ महिला पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

१.  प्रदीप विजय भानुशाली (पोलीस निरीक्षक)

२. हेमंत सुभाष पाटील (पोलीस निरीक्षक)
३. सुरेश नानाभाऊ रोकडे (पोलीस निरीक्षक)
४.  अविनाश लक्ष्मीकांत आघाव (पोलीस निरीक्षक)
५. प्रशांत श्रीराम अमृतकर (पोलीस उपअधीक्षक)
६.  संजय देवराम निकुंबे (पोलीस निरीक्षक)
७.  सुधाकर दत्तू देशमुख (पोलीस निरीक्षक)
८. सागर जगन्नाथ शिवलकर (पोलीस निरीक्षक)
९.  श्रद्धा अशोक वायदंडे (सहायक पोलीस निरीक्षक)
१०. प्रियांका महेश शेळके (सहायक पोलीस निरीक्षक)
११. सचिन सदाशिव माने (सहायक पोलीस निरीक्षक) 

आरोग्यविषयक वृत्त

 

Loading...
You might also like