सन २०१३ च्या परीक्षेत पास झालेल्या ‘त्या’ ११ पोलिसांना उपनिरीक्षक (PSI) पदी पदोन्नती

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सन २०१३ मध्ये विभागीय अर्हता परिक्षेत पास झालेल्या ११ जणांच्या नियुक्त्या रखडल्या होत्या. त्यामुळे त्यांनी ‘महाराष्ट्र अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रायब्युनल’कडे (मॅट) दाद मागितली होती. मॅटने ११ जणांच्या बाजूने निर्णय दिला असून पोलीस महासंचालक कार्यालयाने त्यांच्या नियुक्तीचे आदेश काढले आहेत.

पदोन्नती झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आणि पुढील कंसात पोलीस उप निरीक्षक म्हणून झालेले नियुक्तीचे ठिकाण पुढील प्रमाणे : आनंद ग्यानोबा बन्सोडे (कोल्हापूर), अशोक जयसिंग जाधव (सांगली), गुणवंत पांडुरंग खरात (पुणे शहर), मधुकर मुरलीधर गांगुर्डे (नाशिक ग्रामीण), प्रकाश गंगाराम मुदकोंडवार (यतमाळ), ओंकार रामभाऊ सोळंके (अमरावती ग्रामीण), किरण धनाजी वळवी (ठाणे ग्रामीण), आण्णासाहेब बन्सी परदेशी (अहमदनगर), पांडुरंग किसन माळी (नाशिक शहर), पांडुरंग दगडु खताळ (बृहन्मुंबई)