‘कोरोना’विरूध्द लढण्यासाठी वेगळया मार्गानं समाधान शोधण्यासाठी भारत-अमेरिकेच्या 11 संयुक्त टीम !

नवी दिल्ली : भारतीय आणि अमेरिकन शास्त्रांच्या 11 टिम लवकरच संयुक्त प्रकारे कोरोनाला तोंड देण्यासाठी चौकटी बाहेर जाऊन वेगळे वेगळ्यापद्धतीने काम करणार आहेत. या टिमचे काम कोरोनाशी लढण्यासाठी अँटीवायरल थेरेपीपासून कोरोनाची लक्षणे ओळखणारे सेन्सर बनवण्याचे असेल.

विज्ञान आणि संशोधन मंत्रालयाच्या माहितीनुसार, भारतीय आणि अमेरिकन शास्त्रज्ञांच्या 11 टिम लवकरच एक संयुक्त प्राथमिक वैद्यकीय चाचण्या, अँटीवायरल थेरपी, ड्रग रिप्रोझिंग, व्हेंटिलेटर रिसर्च, विषाणू संशोधन मशीन्स आणि कोरोनाच्या लक्षणांचा शोध घेण्यासाठी एक सेंसर बेस्ड ट्रॅकिंग सिस्टम तयार करतील.

मंत्रालयाच्या माहितीनुसार, युएस-इंडिया सायन्स अँड टेक्नोलॉजी अँडॉव्हमेंट फंड (युएसआयएसटीईएफ) द्वारे एप्रिल 2020 मध्ये जारी करण्यात आलेल्या कोविड-19 इग्निशन ग्रँटअंतर्गत द्विपक्षीय समीक्षा प्रक्रियेच्या माध्यमातून कोरोनाच्या विरूद्धच्या लढाईत या उपक्रमांना पूर्ण करणे या टिमचे काम असणार आहे.

माहितीनुसार, युएसआयएसटीईएफने कोविड-19 च्याविरूद्ध वेगळे प्रगतीशिल विचार मांडणार्‍या 11 टिमसाठी अ‍ॅवार्डची घोषणा केली. युएसआयएसटीईएफची स्थापना भारत सरकार (विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागच्या माध्यमातून) आणि संयुक्त राज्य अमेरिकेद्वारे (राज्य विभागाच्या माध्यमातून) संयुक्त कामाला प्रोत्साहन देण्यासाठी केली आहे, जी विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नवविचार आणि उद्योजगतेला चालना देईल.

यामध्ये म्हटले आहे की, अमेरिका-भारत एस अँड टी आधारित उद्योजकता दल, देखरेख, निदान, आरोग्य आणि सुरक्षा, सार्वजनिक आउटरीच, माहिती आणि संचारसह कोविड-19 संबंधित आव्हानांवर मार्ग काढण्यासाठी नवे तंत्रज्ञान, उपकरणे आणि प्रणालीचा विकास आणि अंमलबजावणीला संबोधित करणार्‍या उप्रकमावर काम करेल.