‘पीलीभीत’मध्ये दिवसाढवळ्या 11 वर्षाच्या मुलाचे ‘अपहरण’, बॉर्डर सील करत सुरू केली तपासणी

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : उत्तर प्रदेशमधील पीलीभीत येथे एका 11 वर्षाच्या मुलाचे अपहरण झाले आहे. पोलिसांनी जिल्ह्यातील सर्व हद्दी सील करून चौकशी सुरू केली आहे. असं सांगितलं जात आहे की मुलाच्या अपहरणाची माहिती तेव्हा मिळाली जेव्हा त्याची आई कामावरुन परत आली आणि मुलाची शोधाशोध करू लागली. यानंतर समजले की दोन जणांनी मुलाला दुचाकीवर बसवून नेले.

पीलीभीतच्या मोहल्ला बशीर खान भागाच्या सुनगढी परिसरातील शंकर लाल यांचा 11 वर्षीय मुलगा लकी हा काका नोखे लाल यांच्या पंक्चरच्या दुकानात बसला होता. तेवढ्यात दुचाकीस्वार आले आणि लकीला दुचाकीवर बसवून घेऊन गेले. त्यावेळी कुणालाच काही माहित झाले नाही. कुटुंबातील प्रत्येकजण असा विचार करत राहिला की मूल कुठेतरी खेळत आहे. घरात काम करून परत आलेल्या लकीची आई सीमाने देखील मुलाची वाट बघितली पण तो घरी आलाच नाही. यानंतर समजले की दुचाकीवरून दोन तरुण आले आणि त्यांनी लकीला नेले आहे. यानंतर आई सीमा, काका नोखे लाल आणि 8 वर्षीय लहान भाऊ निक्की यांनी हंबरडा फोडला.

या सर्व प्रकारानंतर पोलिसांना कळविण्यात आले आणि जिल्ह्यात चौकशी सुरू झाली. दिवसाढवळ्या घडलेल्या प्रकारामुळे पोलिसांमध्येही खळबळ उडालेली आहे. आजूबाजूचे लोक म्हणतात की दुचाकी पॉवर हाऊसकडे जाताना दिसली, पण तेथून दुचाकी कोठे गेली हे कोणालाच माहिती नाही. अज्ञात भीतीने संपूर्ण कुटुंब घाबरले आहे. लकीचे वडील शंकर लाल यांचे निधन झाले आहे.