home page top 1

धक्कादायक ! शस्त्रक्रियेच्या भीतीने भीतीने ११ वर्षीय चिमूरडीने केली आत्महत्या

अंबाजोगाई : पोलीसनामा ऑनलाईन – जीभेखाली गाठ असल्याने ती शस्त्रक्रिया करून काढावी लागणार असल्याची चर्चा ऐकून संभाव्य शस्त्रक्रियेच्या भीतीने घाबरलेल्या एका ११ वर्षीय बालिकेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अंबाजोगाई शहरातील परळी वेस परिसरात सोमवारी दुपारी घडली.

प्रिया सुभाष लोंढे (वय ११, रा. शाहू नगर परळीवेस अंबाजोगाई) असे आत्महत्या करणाऱ्या चिमुरडीचे नाव आहे.

काही दिवसांपुर्वी प्रियाच्या जीभेखाली गाठ तयार झाली होती. त्यामुळे तिला तिचे वडील डॉक्टरांकडे घेऊन गेले होते. डॉकटरीं तिला तपासले. त्यावेळी ती गाठ शस्त्रक्रिया करून काढावी लागेल असे डॉक्टरांनी वडिलांना सांगितले. त्यांच्यातील संभाषण प्रियाने ऐकले. त्यानंतर आता आपल्यावर शस्त्रक्रिया केली जाणार या कल्पनेने तिला भिती वाटली. त्यामुळे या भितीपोटी तिने सोमवारी पत्र्याच्या आडूला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तिच्या आईने हे पाहिल्यावर आरडाओरडा करून शेजाऱ्यांना बोलवले. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

Loading...
You might also like