ICC World Cup 2019 : कोहली Vs विल्यमसन : ‘प्लेस’, ‘व्हेन्यू’ तेच, टीम इंडिया ‘त्या’ वर्ल्डकपचा ‘किस्सा’ गिरवणार का, जाणून घ्या

इंग्लंड : वृत्तसंस्था – विश्वचषक इतिहासात प्रथमच भारत आणि न्यूझीलंड सेमीफायनलमध्ये आमने-सामने आले आहेत. या विश्वचषकात भारत आणि न्यूझीलंड समोरा-समोर येणार होते. मात्र पावसामुळे हा सामना झाला नाही. सेमीफाइनलमध्ये हे संघ भिडणार असले तरी हे दोन्ही संघ ११ वर्षांपूर्वी अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत त्यांच्यात लढा झाला होता. तेव्हा भारतीय संघाने उपांत्य फेरी गाठत विश्वचषक जिंकला होता.

मजेदार गोष्ट म्हणजे,२००८ मध्ये मलेशियात झालेल्या अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत हेच दोन संघ होते. आणि आता दोन्ही संघाचे कर्णधार जे आहेत तेच कर्णधार तेव्हाही होते. केन विल्यमसन आणि विराट कोहली हेच दोघे कर्णधारम्हणून खेळत होते. तेच पुन्हा समोरासमोर येणार आहेत.

विराटने पत्रकार परिषदेत सांगितले, की खूप छान वाटत आहे की ११ वर्षांनी आम्ही दोघे आमच्या सिनियर विश्वचषकात आपापल्या देशाचे नेतृत्व करत आहोत.

२००८ मध्ये झालेल्या समान्यात भारताने न्यूझीलंडवर ३ गडी राखून विजय मिळवला होता. तेव्हा न्यूझीलंडने भारतासमोर ५० षटकात २०५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. यात केन विल्यमसनने ३७ धावा केल्या होत्या. तेव्हाही वातावरणामुळे भारताला ४३ षटकात १९१ धावांचे लक्ष्य मिळाले होते. तेव्हा त्या सामन्यात विराटने ४३ धावा केल्या होत्या. आणि उपांत्य फेरी गाठली होती.

दरम्यान, हा प्रसंग म्हणजे जुन्या प्रसंगांची पुनरावृत्तीच आहे. त्यामुळे विजयाबाबतही पुनरावृत्तीच होईल का हे पाहणे महत्त्वाचे आहे. कारण हा सामना भारतासारखाच न्यूझीलंडसाठी महत्त्वाचा आहे.

आरोग्यविषयक वृत्त –

‘त्वचा’ होईल तजेलदार आणि वाढेल ‘डोळ्यां’ची क्षमता, दररोज ‘हे’ करा

पावसाळ्यात ‘मेकअप’ करताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या

तुमच्या ‘आयब्रो’ चा रंग अधिक डार्क करण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स

‘गुळ’ या आजारांवर ठेवतो नियंत्रण

द्रुतगती महामार्गावर भिषण अपघातात तीन ठार, एक गंभीर जखमी

माजी खासदार राजीव सातव यांचे मराठवाडा प्रदेश कार्यकारिणी च्या अध्यक्ष पदी नाव चर्चेत

अर्थसंकल्प सादर केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ