11 वर्षाच्या मुलीनं दिला मुलाला ‘जन्म’, 3 नातेवाईक ‘आरोपी’

वॉशिंग्टन : पोलीसनामा ऑनलाइन  – अमेरिकेमध्ये 11 वर्षाच्या मुलीने घरातील बाथटबमध्ये एका मुलाला जन्म दिला. मिसौरी प्रांतातील या प्रकरणात मुलीच्या तीन नातेवाईकांवर गुन्हेगारी आरोप ठेवण्यात आले आहेत. एक महिला आणि एका पुरुषावर मुलीचा जीव धोक्यात टाकल्याचा आरोप आहे. तर 17 वर्षीय किशोरवयीन मुलाला वाईट कृत्य आणि व्यभिचाराच्या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे. हे प्रकरण मिसौरीच्या सेंट चार्ल्स शहरातील उपनगरीय परिसर सेंट लुईस येथील आहे. तिन्ही आरोपी सेंट चार्ल्समध्ये राहतात.

चार्जशीटनुसार 11 फेबुवारीला एक व्यक्ती नवजात बाळाला घेऊन हॉस्पिटलमध्ये आला होता. पोलिसांनी जेव्हा त्याची चौकशी केली तेव्हा त्याने अज्ञात व्यक्ती आपल्या घरासमोर बाळाला ठेवून निघून गेल्याचे सांगितले. परंतु, नंतर त्याने मान्य केले की तो त्याचा नातेवाईक आहे. आरोपीने पोलिसांना सांगितले की, त्यास मुलगी गरोदर असल्याचे माहित नव्हते आणि तिचा लैंगिक छळ झाल्याचेही माहित नव्हते. मात्र किशोरवयीन आरोपीने मुलीशी लैंगिक संबंध ठेवल्याचे कबुल केले आहे.