1100 औषधे 80 टक्क्यांपर्यंत होणार ‘स्वस्त’, अधिक पैसे मागितल्यास ‘या’ नंबरवर करा तक्रार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गंभीर आजार, मधुमेह, हृदय, संसर्ग अशा अनेक रोगांमध्ये उपयुक्त असलेल्या 1100 औषधांच्या किंमती 50 ते 80% पर्यंत कमी केल्या आहेत. प्राइज मॉनिटरिंग रिसोर्स युनिटमध्ये ड्रग मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनच्या संमतीने हा निर्णय घेण्यात आला आहे.

अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. अनिता भटनागर जैन यांनी औषध निरीक्षकांना आदेश जारी केला आहे की या ऑर्डरची प्रत प्रत्येक मेडिकलमध्ये लावावी. जेणेकरुन ग्राहक स्वतःच मोबाईलवरील औषधांची किंमत, ब्रँडनेम चेक करून त्या आधारावरच पैसे देतील.

अपर मुख्य सचिवांद्वारा जारी केलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, ‘भारत सरकारकडून अनुसूचित व सूचित वर्गांच्या सुमारे 1100 औषधांच्या किंमती 50 ते 80 टक्क्यांनी कमी केल्या आहेत. याविषयी सामान्य लोकांना माहिती देण्यासाठी प्रसिद्धी देखील आवश्यक आहे. 31 डिसेंबरपर्यंत एक लाख आठ हजार 701 मेडिकलमध्ये (रुग्णालयात चालणार्‍या मेडिकलसह) ए 4 आकारात ऑर्डरची प्रत चिकटावी लागेल. खाद्य सुरक्षा आणि औषध विभागाची वेबसाइट, संपर्क आणि तक्रारीसाठी मोबाइल अ‍ॅप आणि फोन नंबर देखील जारी केला आहे. ही सार्वजनिक माहिती राज्यातील सर्व मेडिकलमध्ये चिकटवायची आहेत.’

अधिक किंमत घेतल्यास येथे करा तक्रार –
कोणत्याही दुकानदाराने औषधाच्या निर्धारित किंमतीपेक्षा जास्त किंमत मागितल्यास ग्राहक भारत सरकारच्या टोल फ्री क्रमांकावर 1800111255 तक्रार करू शकतात.

अशाप्रकारे जाणून घ्या औषधांची किंमत –

www.nppaindia.nic.in किंवा PHARMA SAHI DAAM अ‍ॅपवर तपासा. प्रथम औषधाचे नाव आणि ब्रँडचे नाव टाका. त्यानंतर औषधाची किंमत दिसेल.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/