‘या’ नेत्याने केला उपोषणावर तब्बल १० कोटी रुपये खर्च

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी 11 फेब्रुवारीला दिल्लीत एक दिवसाचे उपोषण केले होते. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा मिळावा. यासाठी चंद्राबाबूंनी दिल्लीतील आंध्र भवन येथे उपोषण केले होते. या एक दिवसीय उपोषणावर तब्बल त्यांनी 10 कोटी रुपयांचा खर्च झाल्याचे समोर आले आहे. याबाबत आंध्र सरकारने 6 फेब्रुवारीलाच निर्देश जारी केले होते. यामध्ये विरोध प्रदर्शनासाठी ही रक्कम खर्च करण्यात येत असल्याचे म्हंटले आहे.

त्यावेळी नवी दिल्लीत झालेल्या उपोषणासाठी आंध्र सरकारने दोन रेल्वे बूक केल्या होत्या. या आंदोलनात सहभागी होणाऱ्यांसाठी श्रीकाकूलम आणि अनंतपूर येथून या ट्रेन बुक करण्यात आल्या होत्या. यासाठी सरकारने खूप खर्चही केला होता. या दोन ट्रेन बूक करण्यासाठी सरकारने 1 कोटी 12 लाख रुपये खर्च केले. त्याशिवाय सरकारने थांबण्याच्या आणि खाण्या-पिण्याच्या व्यवस्थेवरही भरमसाठ खर्च केला. आंदोलनात सहभागी झालेल्यांसाठी दिल्लीमध्ये 1100 खोल्यांची व्यवस्था करण्यात आली होती. यात व्हीआयपी आणि इतर सर्वांचा समावेश होता. या सर्व सुविधांसाठी आंध्र प्रदेश सरकारने तब्बल 10 कोटी रुपयांचा खर्च केला आहे.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आंध्र प्रदेशला विशेष दर्जा मिळावा यासाठी आक्रमक पवित्रा घेत दिल्लीतील आंध्र भवन इथे एक दिवसीय उपोषण केले होते. ते सकाळी 8 पासून उपोषणावर बसले होते. उपोषणादरम्यान नायडूंनी पंतप्रधान मोदींवर आरोप केला की त्यांनी राजधर्माचे पालन केले नाही. 2014 साली केंद्र सरकारने आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यांनी ते पूर्ण केले नाही.

Loading...
You might also like