Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 11 हजार 88 नवे पॉझिटिव्ह, आतापर्यंत 18306 जणांचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   जगभरात धुमाकुळ घालणाऱ्या कोरोनाचा प्रादुर्भाव देशासह राज्यात अद्यापही झपाट्याने वाढताना दिसत आहे. राज्यातील कोरोना बाधितांची संख्या 5 लाखांच्या पुढे गेली आहे. आज दिवसभरात राज्यात 11 हजार 088 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 5 लाख 35 हजार 601 वर पोहचली आहे. तर दिवसभरात 256 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 18.87 टक्के इतके आहे.

राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 1 लाख 48 हजार 553 इतकी आहे. तर आतापर्यंत 18 हजार 306 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्यू दर 3.42 इतका असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने माहिती दिली आहे. राज्यात आज 10014 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी पाठवण्यात आले आहे. तर, आजपर्यंत राज्यात तब्बल 3 लाख 68 हजार 435 जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचा रिकव्हरी रेट वाढला असून राज्याचा रिकव्हरी रेट 68.79 टक्के इतका झाला आहे.

सध्या राज्यामध्ये तब्बल 10 लाख 04 हजार 233 जण गृहविलगीकरणात (होमक्वारंटाइन) आहेत. तर 35 हजार 648 जण संस्थात्मक विलगीकरणात (इन्स्टिट्युशनल क्वारंटाइन) मध्ये आहेत. राज्यात आतापर्यंत 28 लाख 37 हजार 578 प्रयोगशाळा चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी 5 लाख 35 हजार 601 जणांचे कोरोना चाचणीचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.