‘बँक ऑफ बडोदा’चा ११२ वा स्थापना दिवस उत्साहात साजरा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – ‘बँक ऑफ बडोदा’ रास्ता पेठ शाखेतर्फे बँकेचा ११२ वा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. रास्ता पेठ शाखेतर्फे सर्व ग्राहकांना स्थापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

यानिमित्त बँकेच्या CSR activity अंतर्गत रास्ता पेठ येथील ‘राजा धनराज गिरजी स्कुल’ मध्ये गरीब व गरजू अशा ३२ विद्यार्थ्यांना शाळेच्या बॅग्स आणि खाऊचे वाटप करण्यात आले. यावेळी बँक ऑफ बडोदा रास्ता पेठ शाखेचे वरिष्ठ शाखा प्रबंधक श्री. पी. एस. जाधव यांनी ग्राहकांना बँकेच्या विविध योजनांची माहिती देऊन त्यांचा उपभोग घेण्याचे आवाहन केले.

यावेळी बँकेचे अधिकारी एम. एम. विडेकर, अमोल फाये, उत्तम कुमार, अलका मेश्राम, स्तुती माहेश्वरी, रुपाली पगारे, मोरे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता शिंदे यांनी बँकेचे आभार मानले.

आरोग्यविषयक वृत्त