भोकर : दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीमध्ये झालेल्या दंगलीतील ११३ आरोपीची निर्दोष मुक्तता

भोकर : माधव मेकेवाड

जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री एम. एस. शेख यांनी पुराव्या अभावी आज (दि. २७) निर्दोष मुक्तता केली. प्रस्तुत प्रकरणात एकूण ११३ आरोपी विरुद्ध सन्मानिय जिल्हा व सत्र न्यायालयात सन २००२ मध्ये दोषारोप पत्र दाखल करण्यात आले होते सदर प्रकरणामध्ये एकूण ०७ साक्षीदाराचे जबाब नोंदविण्यात आल्या प्रस्तुत प्रकरणात आरोपीची संख्या  हिंदू- मुस्लिम भरपूर असल्यामुळे प्रकरण चालवण्यास भरपूर अडचणी निर्माण होऊन प्रकरण हे पूर्ण होण्यास  जवळपास १५ ते १६ वर्षाचा कालावधी लागला. शेवटी, जिल्हान्यायाधीश श्री. एम. एस. शेख यांनी आरोपी विरुद्ध कुठल्याही सबळ पुरावा उपलब्ध न झाल्यामुळे सर्व हिंदू व मुस्लिम एकूण ११३ आरोपीची प्रस्तुत प्रकरणामधून निर्दोष मुक्तता केली.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’16fbea99-c23a-11e8-b6ee-2526413d2452′]

आरोपी कडून अॅड.संदीप बी कुंभेकर, अॅड.दीपक भातलंवडे,अॅड.महमद सलीम,अॅड.अलतमाश, यांनी काम पाहिले व सरकारी वकीलाकडून अॅड.रमेश राजूरकर यांनी काम पाहिले.