ओह मारिया ! 113 वर्षांच्या आजींनी केलं ‘कोरोना’ला पराभूत

नवी दिल्ली – स्पेन या देशात कोरोना विषाणूने मोठा हाहाकार माजवला आहे. त्या देशात सर्व वैद्यकीय यंत्रणा सक्षम असतानाही मोठ्या प्रमाणात कोरोनामृत्यू झाले. कोरोनाबाबत माहिती देताना पहिल्यापासून असं सांगितलं जातंय की ज्येष्ठ नागरिकांना कोरोना विषाणूची बाधा होण्याची जास्त शक्यता आहे. पण स्पेनमधील एका 113 वर्षांच्या आजींनी कोरोनाला सहज पराभूत केलं आहे. स्पेनमधील सर्वांत वयोवृद्ध असलेल्या मारिया ब्रेनयस या एका वृद्धाश्रमात राहतात. त्यांना एप्रिल महिन्यात कोरोना विषाणूची बाधा झाली होती. त्यानंतर त्यांनी स्वत:ला आयसोलेट केलं आणि कोरोनाशी लढा दिला. त्या स्वत: ची औषधं स्वत: घ्यायच्या आणि गरज वाटेल तेव्हाच डॉक्टरांना बोलवायच्या. त्यांनी एक आठवडा संपूर्ण विश्रांती घेतली आणि गेल्या आठवड्यात त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. 113 वर्षांच्या आजीही कोरोनावर मात करू शकतात त्यामुळे सावध रहा पण घाबरू नका.