Coronavirus : राज्यात ‘कोरोना’चे 117 नवे रूग्ण तर 8 जणांचा मृत्यू, महाराष्ट्राची संख्या 1135 वर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. कोरोनाचा भारतात देखील हाहाकार चालू आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती देखील अत्यंत बिकट असून कोरोनाचे आज राज्यात तब्बल 117 नवीन रूग्ण आढळून आले आहेत. कोरोनामुळं आज राज्यात 8 जणांचा मृत्यू झाला असून आता राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1135 वर जाऊन पोहचली आहे. राज्यात आतापर्यंत तब्बल 72 जणांचा मृत्यू झाल्याचं एएनआय या वृत्तसंस्थेनं महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाच्या हवाल्यानं सांगितलं आहे.


कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्यानं परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे. मुंबई आणि पुण्यात कोरोनामुळं सर्वजण हैराण झाले आहेत. पुण्यात आज दिवसभरात 8 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये ससून रूग्णालयात 5, नायडू रूग्णालयातील 1 आणि इतर दोन खासगी रूग्णालयात प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश आहे. देशात सर्वाधिक कोरोनाबाधित हे महाराष्ट्रात असल्याचं आकडेवारीवरून स्पष्ट झालं आहे.

पुण्यात ‘कहर’ : 24 तासात 8 बळी तर 25 नवे रूग्ण

कोरोना व्हायरसनं पुणे शहरात अक्षरशः धुमाकूळ घातला असून गेल्या 24 तासात कोरोनामुळं शहरात एकुण 8 जणांचा मृत्यू झाल्याचं एनएनआय या वृत्तसंस्थेनं सांगितलं आहे. दरम्यान शहरात आज नव्याने तब्बल 25 कोरोनाबाधित आढळले असून शहरातील एकुण रूग्णांची संख्या 154 वर जाऊन पोहचली असल्याचं पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटरवरून सांगितलं आहे. दरम्यान, पुण्यात कोरोना व्हायरसमुळं मृत्यू होणार्‍यांची संख्या आता 16 वर जाऊन पोहचली आहे.

आज (बुधवार) ससून रूग्णालयात 5 जणांचा मृत्यू झाला आहे तर नायडू हॉस्पीटलमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. इतर दोघांचे मृत्यू वेगवेगळया खासगी रूग्णालयात झाले आहेत. गेल्या 14 तासात कोरोनामुळं शहरात 8 जणांचा मृत्यू झाल्याचं एएनआय या वृत्तसंस्थेनं सांगितलं असल्याचे सर्वत्र खळबळ उडाली आहे. नव्याने आढळणार्‍या रूग्णांची संख्या देखील 25 असल्याने शहरातील एकुण कोरोनाबाधितांची संख्या 154 वर जाऊन पोहचली आहे. दरम्यान, शहरात कोरोनामुळं 8 जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला मनपाच्या आरोग्य विभागाचे डॉ. रामचंद्र हंकारे यांनी देखील दुजोरा दिला आहे.

एकंदरीत पुण्यात कोरोनामुळं चिंतेचं वातावरण आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाकडून वेळावेळी केलं जात आहे. दरम्यान, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम्, पुणे मनपाचे आयुक्त शेखर गायकवाड तसेच पुण्याचे सह पोलिस आयुक्त रविंद्र शिसवे आणि प्रशासनातील तसेच आरोग्य विभागातील इतर सर्व वरिष्ठ अधिकारी पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियोजन करीत आहेत. पोलिसांनी दोनच दिवसांपुर्वी 4 पोलिस ठाण्याच्या हद्दीतील काही परिसर सील केला असून तिथं संपुर्णपणे संचारबंदी देखील केली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
Cinque Terre
You might also like