बीडच्या 118 वर्षीय दादारावांनी थेट मुंबईलाच गाठलं, म्हणाले – ‘धनंजय मुंडेंची भेट हवीय’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – परळी मतदार संघातून भाजपच्या पंकजा मुंडे यांचा पराभव करून विजय संपन्न केलेल्या राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे यांची तरुणांपासून ते वयोवृद्ध अशा सर्वच वयाच्या गटामध्ये फॅनफॉलोविंग आहे. धनंजय मुंडे यांची भाषण करण्याची शैली आणि जनमानसातील संपर्क यामुळेच परळीकरांनी यावेळी त्यांचे नेतृत्व स्वीकारले.

118 वर्षीय बीडचे स्वातंत्र्यसेनानी साहेबराव थोरवे दादा यांनी धनंजय मुंडे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेत अभिनंदन केले. खास धनंजय मुंडेंची भेट घेण्यासाठीच ते आष्टीहून मुंबईला आले होते. 118 वर्षीय दादांना पाहून आपल्यालाही स्फुरण आल्याचे मुंडे यांनी म्हंटले आहे. धनंजय मुंडे यांनी आपल्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवरून त्यांच्यासोबतच फोटो शेअर करत आपण भारावून गेलो असल्याचे म्हंटले आहे. या वयातही दादा माझे अभिनंदन करण्यासाठी आल्यामुळे मलाही स्फुरण आल्याचे धनंजय मुंडे यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हंटले आहे.

तसेच नाशिकवरून आलेल्या अपंग बांधवाने जो कम्प्युटर इंजिनिअर आहे. त्यानेही धनंजय मुंडे यांच्या विजयासाठी ग्रामदैवतेला साकडे घातले होते. म्हणून विजयानंतर विजय म्हस्केंनी धनंजय मुंडे यांची भेट घेतली. विजय सोबतचा फोटो शेअर करत असे कार्यकर्ते हीच माझी ऊर्जा असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले.

 

Visit : Policenama.com