११ वीच्या पुस्तकात ‘समलैंगिक’ विवाह, ‘लिव्ह इन रिलेशनशीप’चा समावेश

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – ११ वी समाजशास्त्राच्या पुस्तकात महत्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. काही मुद्दे नव्याने सहभागी करून घेण्यात आले आहेत. आतापर्यंत ११ वी समाजशास्त्राच्या पुस्तकात कुटुंबाचे दोनच प्रकार विषद करण्यात आले होते. एक विभक्त आणि दुसरे संयुक्त. आता मात्र या दोन प्रकारांसोबत, घटस्फोटित माता, समलैंगिक विवाह, लिव्ह इन रिलेशनशीप याही प्रकारांचा समावेश करण्यात आला आहे. काळानुसार बदल करण्यासाठी बालभारतीने पुस्तकात हा बदल केला आहे.

गेल्या दोन दशकांमध्ये भारतीय समाजव्यवस्थेमध्ये बरेच बदल झाले आहेत. लिव्ह इन रिलेशनशीपचे प्रमाण खूप वाढले आहेत. घटस्फोटित महिला समर्थपणे त्यांच्या मुलांचे संगोपन करत आहेत. २०१८मध्ये समलैंगिक संबंधांनाही भारतात कायद्याने मान्यता मिळाली आहे. या पार्श्वभूमीवर ११वी समाजशास्त्राच्या पुस्तकात अनेक बदल बालभारतीने केले आहेत. गतिमान समाजव्यवस्थेचे प्रतिबिंब अभ्यासक्रमात पडावे हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून बालभारतीने या संकल्पनांचा समावेश ११वी समाजशास्त्राच्या पुस्तकात केला आहे. तसंच विवाहाचं वाढतं वय, घटस्फोटांचे वाढते प्रमाण याची कारणमिमांसाही या पुस्तकात करण्यात आली आहे.

लिव्ह इन रिलेशनशीपही युरोपमध्ये प्रचलित असून आता भारतातील शहरी भागात देखील लिव्ह इन रिलेशनशीपचे प्रमाण वाढते आहे असं या पुस्तकात सांगण्यात आलं आहे. ११वीच्या पुस्तकात पहिल्यांदाच अनेक आधुनिक संकल्पना समाविष्ट केल्यामुळे बालभारतीचे कौतुकही करण्यात येतं आहे.

 

आरोग्यविषयक वृत्त –