11वी च्या विद्यार्थीनीनं क्लासरूममध्येच केलं एकदम ‘घाणेरडं’ काम, पाहून प्राध्यापकासह सर्वच ‘हैराण-परेशान’ !

जालंधर : वृत्त संस्था – पंजाबच्या जालंधर शहरात एक अशी घटना समोर आली आहे, जी समजली तर तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटेल. ही घटना एका शाळेतील आहे, जेथे एका 11 वीच्या विद्यार्थीनीने आपल्या क्लासरूममध्येच वाईट काम सुरू केले, जे पाहून जवळपास बसलेले विद्यार्थी हैरान झाले.

हे प्रकरण जालंधर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील आहे. याच गावातील एका सरकारी शाळेत ही विद्यार्थीनी 11 वीच्या वर्गात शिकते. ही विद्यार्थीनी वर्गात अचानक विचित्र हालचाली करण्यासोबतच विचित्र आवाज काढू लागली. यानंतर आसपास बसलेले विद्यार्थी तिच्याकडे घाबरून बघू लागले.

ही घटना घडली तेव्हा वर्गात शिक्षक नव्हते. यानंतर वर्गातील काही मुलांनी या प्रकाराची माहिती शाळेच्या प्रिन्सिपलला दिली. प्रिन्सिपल सुद्धा वर्गात आले तेव्हा तेसुद्धा हैरान झाले. जेव्हा प्रिन्सिपल विद्यार्थीनीच्या जवळ गेले तेव्हा त्यांना तिच्याजवळ एक दारूची बाटली सापडली आणि विद्यार्थीनीच्या तोंडातूनही दारूचा वास येत होता.

प्रिन्सिपलने या घटनेची माहिती विद्यार्थीनीच्या आई-वडीलांना दिली. त्यांना ताबडतोब शाळेत बोलावले. यानंतर मुलीला शाळेतून काढून टाकण्यात आले. मुलीच्या आई-वडीलांना तिच्या वागण्याने जबरदस्त धक्का बसला आहे.