११ वी च्या विद्यार्थ्याला शिक्षकांकडून बेदम मारहाण

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाईन – अभ्यास करत नाही म्हणून अकरावी सायन्सच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याला दोन शिक्षकांनी बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी सकाळी डी. टी. पाटील ज्युनिअर कॉलेज दापोडी येथे घडली.

अथर्व शशिकांत देशपांडे याने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून तो जखमी झाला आहे. पोलिसांनी उजागरे सर, जावळे सर (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) या दोन शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अथर्व हा दापोडी येथील डी. टी. पाटील ज्युनिअर कॉलेजमध्ये अकरावी सायन्सच्या वर्गात शिकतो.

शुक्रवारी दोन्ही शिक्षकांनी अथर्व याला वर्गाबाहेर बोलावले. उजागरे याने ‘अभ्यास कमी करतो, तुला माझ्या विषयात शून्य मार्क देतो’ असे म्हणत त्याला दोन कानशिलात लगावली. जावळे सर याने डोक्यावर, तोंडावर, पाठीवर, नाकावर हाताने मारून अथर्व याला दुखापत केली. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

You might also like