12 BJP MLA Suspended | 12 आमदारांच्या निलंबनाने सत्ताधार्‍यांची खुर्ची मजबूत होणार ? जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या (Assembly Session) पहिल्याच दिवशी विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या 12 आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन (12 BJP MLA Suspended) करण्यात आले. विरोधकांच्या 12 आमदारांचे निलंबन झाल्याने सत्ताधाऱ्यांच्या स्थिरतेसाठी (Stability) अत्यंत पोषक असल्याचे निरीक्षण राजकीय वर्तुळातून नोंदवण्यात येत आहे. विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या (Assembly Session) पहिल्या दिवशी भाजपचे आशिष शेलार, पराग आळवणी, योगेश सागर आणि अतुल भातखळकर यांना निलंबित (12 BJP MLA Suspended) करण्यात आले आहे.

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

पुढील वर्षी मुंबई महापालिका निवडणुका (BMC Elections) होणार आहेत. त्यातच भाजपच्या मुंबईतील शिलेदारांना निलंबित केल्याने त्यांना कोणत्याही प्रशासकीय आणि संवैधानिक कामकाजामध्ये भाग घेता येणार नाही. त्यामुळे या आमदारांचे निलंबन हे महाविकास आघाडीच्या स्थिरतेसाठी अत्यंत पोषक असल्याचे मत राजकीय विश्लेषकांनी नोंदवले आहे.

अशी बदलली सत्तेची समीकरणं
विरोधी पक्ष असलेल्या भाजपकडे (BJP) राज्यात 106 आमदारांचे पाठबळ आहे. राज्यात सत्ता स्थापनेसाठी 145 हा जादुई आकडा आहे. भाजपला राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी 39 आमदारांची गरज होती. तर 10 आमदारांनी भाजपला पाठिंबा द्यायला तयार असल्याचे चित्र आहे. उरर्वरीत आमदारांची संख्या पूर्ण करण्यासाठी भाजप आमदारांना फोडून राज्यात सरकार स्थापन करणार अशी चर्चा होती. परंतु आता 12 आमदारांचे निलंबन करण्यात आल्याने भाजपचे सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न अपुरं राहिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

SPPU Pune University | पुणे विद्यापीठाच्या दुसऱ्या सत्राच्या परीक्षांची तारीख जाहीर, ‘या’ तारखेपासून सुरु होणार परीक्षा

सरकारला किमान 1 वर्ष तरी धोका नाही
विधीमंडळामध्ये भाजप कोणती खेळी करेल आणि आमदार फोडून सत्तास्थापनेचा दावा करेल, याची भीती सत्ताधारी महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मोदी भेट, त्यानंतर काँग्रेसची स्वबळावर निवडणूक लढवण्याची भाषा. राष्ट्रवादीच्या नेत्याविरुद्ध सुरु असलेली चौकशी. यामुळे हे सरकार अस्थिर झाल्याचे चित्र होते. परंतु आता 12 आमदारांचे निलंबन झाल्याने किमान एक वर्ष तरी महाविकास आघाडी सरकारचा धोका टळला आहे, अशी देखील चर्चा आहे.

राज्यात राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता
भाजपच्या आमदारांचे निलंबन झाल्याने भाजपचे सत्ता स्थापनेचे स्वप्न अपुरं राहिलं आहे.
आता एखाद्या पक्षानं पाठिंबा देणे, हा एकमेव पर्याय भाजप समोर असणार आहे.
त्यामुळे आमदार फोडून सत्ता स्थापन करणं आणि सरकार उलथवण्याची शक्यता कमी झाली आहे.
12 आमदारांच्या निलंबनानंतर याचे जोरदार राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
राज्यात पुढील काही दिवसांत मोठ्या राजकीय घडामोडी घडू शकतात अशी देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे.

केंद्र विरुद्ध राज्य संघर्ष चिघळण्याची शक्यता
महाराष्ट्रातील या घटनेचे पडसाद दिल्लीत उमटण्याची शक्यता आहे.
त्याचा परिणाम येत्या काळात पहायला मिळू शकतो, असं राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
केंद्रातील मोदी सरकार लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार करणार असल्याची चर्चा आहे.
शिवाय मोदी-ठाकरे यांच्यात पुन्हा संवाद सुरु होत असल्याचे पहायला मिळत आहे.
परंतु आजच्या घटनेमुळे केंद्र विरुद्ध राज्य असा संघर्ष चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Web Titel : 12 BJP MLA Suspended action on 12 mla can prove fruitful for mva governments stability

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Bhaskar Jadhav । ‘मला आई-बहिणीवरून शिव्या दिल्या, आजचा दिवस लोकशाहीला काळीमा फासणारा’