12 BJP MLA Suspended | ‘आमच्यावर बॉम्ब टाकायला निघाले होते, त्यांच्याच हातात फुटला’, संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन (Policenama online) – इतर मागासवर्गीय (OBC) राजकीय आरक्षणाचा ठराव सोमवारी विधानसभेत मांडण्यात आला. यावेळी ठरावावेळी विरोधकांनी जोरदार गदारोळ केला. पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपच्या 12 आमदारांचे File  निलंबन (12 BJP MLA Suspended) करण्यात आले. अध्यक्षांच्या दालनात पीठासीन अधिकारी भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांना शिवीगाळ आणि अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी भाजपच्या 12 आमदारांचे एक वर्षासाठी निलंबन (12 BJP MLA Suspended) केले आहे. या कारवाई विरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे. तर या कारवाईवरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी भाजपवर टीकेचे बाण डागले आहेत.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram,
facebook page and Twitter for every update

माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले, सभागृहात सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न सुरु होता. पण कोकणात एक म्हण आहे केले तुका, झाले माका. बॉम्ब त्यांच्या हातातच फुटला. ते आमच्यावर बॉम्ब टाकणार होते. पण चूक किती महागात पडू शकते, असा टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे.

महाराष्ट्रात अशी परंपरा पडू नये

संजय राऊत पुढे म्हणाले, 12 आमदारांचं झालेलं निलंबन हा एक शिस्तीचा भाग आहे. शिस्त मोडणाऱ्यांवर कारवाई केली नाही तर सभागृहात दंगली होतील. पाकिस्तानच्या संसदेत Parliament of Pakistan) आपण पाहिलं. काही वेळा बिहार, उत्तर प्रदेशच्या विधानसभेत आम्ही पाहिलं आहे. संपूर्ण दंगलीसारखं चित्र निर्माण झालं होतं. महाराष्ट्रात अशी परंपरा पडू नये. त्यामुळे अध्यक्षांनी कठोर निर्णय घेतला असेल, असं राऊत म्हणाले.

तालिका समितीच्या अध्यक्षांना शिवीगाळ

संजय राऊत पुढे म्हणाले, 12 आमदारांचं वर्तन तुम्ही बघितलं असेल, ते आमदार कशा प्रकारे वागले. अध्यक्षांसमोरील वेलमध्ये गेले, हे आम्ही पाहतोय, आम्ही त्या सभागृहात नव्हतो. तालिका समितीचे अध्यक्ष भास्कर जाधव हे विधानसभा अध्यक्ष म्हणून काम पहात होते. यांची अशी भूमिका आहे की, त्यांना शिवीगाळ केली, धक्काबुक्की केली. विधानसभेच्या इतिहासात अशा प्रकारचं वर्तन झालं नव्हतं असं ते म्हणाले. कालच सर्वोच्च न्यायालयाचा (Supreme Court) एक निकाल आहे. सर्वोच्च न्यायालयानेही तेच सांगितलं की, आमदार-खासदारांचं सभागृहातील अशा प्रकारचे वर्तन सहन करता कामा नये, असे राऊत यांनी सांगितले.

Join our Policenama WhatsApp Group Link , Telegram,
facebook page and Twitter for every update

Web Title : 12 bjp mla suspended sanjay raut reaction on twelve bjp mlas
were suspended from the maharashtra legislative assembly for one year

हे देखील वाचा

Coronavirus | दिलासादायक ! राज्यात गेल्या 24 तासात 13,027 ‘कोरोना’मुक्त, 6,740 नवीन रुग्ण

Pune Crime Branch Police | दरोड्याच्या तयारीत असलेल्या बबन व्यवहारे याच्यासह चौघांना गुन्हे शाखेकडून अटक

12 BJP MLA Suspended | 12 आमदारांच्या निलंबनाने सत्ताधार्‍यांची खुर्ची मजबूत होणार ?
जाणून घ्या

SPPU Pune University | पुणे विद्यापीठाच्या दुसऱ्या सत्राच्या परीक्षांची तारीख जाहीर,
‘या’ तारखेपासून सुरु होणार परीक्षा