PMC बँक घोटाळा : जप्‍त करण्यात आलेल्या 12 ‘अलिशान’ गाड्यांचं घोटाळ्याशी ‘कनेक्शन’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंजाब अ‍ॅण्ड महाराष्ट्र को-ऑपरेटिव बँक घोटाळा प्रकरणी अनेकांना ताब्यात घेत असल्याचे समोर येत आहे. या प्रकरणातून अनेक नवे खुलासे होत आहेत. शुक्रवारी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) मुंबईत 6 ठिकाणी छापे टाकले. यात रॉल्स रॉयस, रेंज रोवर आणि बेंटली सारख्या 12 लक्झरी गाड्या जप्त करण्यात आल्या. या सर्व कार हाउसिंग डेवलपमेंट अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे अध्यक्ष राकेश वाधवान आणि त्यांचा मुलगा सारंग वाधवान यांच्या आहे.

ईडीने 4,355,46 कोटी रुपयांच्या पीएमसी बँक प्रकरणात HDIL प्रमोटर्सवर मनी लॉन्ड्रिंगचा खटला दाखल केला आहे. आर्थिक प्रकरणांची तपासणी करणारी संस्था 18 इतर कंपन्याची माहिती गोळा करत आहे ज्यांचा संबंध HDIL शी संबंधित आहे.

ईडीने ज्या 6 जागावर छापे मारले त्यात वांद्रा (ईस्ट) भागातील एचडीआयएलचे हेड ऑफिस आणि राकेश वाधवान यांच्या घरांचा समावेश आहे. ईडीने पीएमसी बँकचे माजी अध्यक्ष वरयम सिंह आणि सध्याचे प्रबंध निदेशक जॉय थॉमसच्या घरी छापा मारला. ईडीला तपासात स्पष्ट झाले की IPL क्रिकेट टीम कोलकत्ता नाइट राइडर्सच्या स्पॉन्सर्समध्ये एक एचडीआयएल देखील आहे. एचडीआयएलने कॉत्योर वीक इंडिया नावाने मुंबईमध्ये फॅशन इवेंट ऑर्गेनाइज केली आहे. अधिकारी ब्रदर्समध्ये एचडीआयएलचे शेअर्स आहेत.

ईडीने सांगितले की कंपनीच्या सुरुवातीपासून झालेल्या डील्सचा तपास करण्यात येणार आहे. ईडीने 3 ऑक्टोबरला या प्रकरणी प्रिवेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग अ‍ॅक्ट अंतर्गत केस दाखल करण्यात आली आहे. ईडीने सांगितले की वाधवान ग्रुप आणि बँकेसंबंधित माहिती जमा करत आहे. सध्या एचडीआयएच्या 7 निदेशकांच्या भूमिकेबद्दल तपास करत आहे.

काय आहे घोटाळा
आरबीआयने नियुक्त अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरुन पीएमसी बँकेच्या अधिकाऱ्यांच्या विरोधात घोटाळ्याचा, फसवणूकीच्या आरोपांतर्गत कारवाई करण्यात आली. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने तक्रार दाखल केली होती, पोलिसांनी सांगितले की 2008 नंतर बँकेने 4,355.46 कोटी रुपयांचे नुकसान झाले. तक्रारीत पीएमसी बँकचे माजी अध्यक्ष वरयम सिंह, प्रबंधक निदेशक जॉय थॉमस, एचडीआयएलचे एक निदेशक आणि इतर अधिकाऱ्यांचे नाव आहे.

visit : Policenama.com