पुण्यातील स्वारगेट परिसरात १२ लाखांचे ब्राउन शूगर जप्त

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

ब्राऊन शूगर विक्रीसाठी आलेल्या तरुणाला गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून १२ लाख ६९ हजरा रुपयांचे २५५ ग्रॅम २६० मिली ब्राउन शूगर जप्त करण्यात आली. ही कारवाई शुक्रवारी (दि.३१ ऑगस्ट) रोजी रात्री इंदिरानगर झोडपडपट्टीतील महाराष्ट्र हार्डवेअर दुकानासमोरील सार्वजनिक रस्त्यावर करण्यात आली.
[amazon_link asins=’B01DDP7D6W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’8ee52f8c-adcf-11e8-8636-73423b14ed70′]

अशोक अर्जुन जाधव (वय-३४ रा. इंदिरानगर झोपडपट्टी, मार्केट यार्ड, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अशोक जाधव हा शहरामध्ये मोठ्याप्रमाणात ब्राऊन शूरगची विक्री करत असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुनिल दोरगे यांना मिळाली. त्यानुसार पोलीस उपायुक्त ज्याेतीप्रिया सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली इंदिरानगर झोपडपट्टीत सापळा रचून आरोपीला अटक केली. त्याच्याकडून १२ लाख ६९ हजार रुपयांचे ब्राऊन शूगर जप्त करण्यात आले.

सांगली : राज्यात पाच कोटींच्या बनावट नोटा चलनात, मुंबईतून दोघांना अटक 

ही कारावाई पोलीस उपायुक्त ज्योतीप्रिया सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनिल दोरगे, सहायक पोलीस निरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस हवालदार महेंद्र पावार, शिवाजी राहीगुडे, पोलीस नाईक प्रफुल्ल साबळे, मनोज साळुंके, हेमंत वाघमारे, विशाल शिंदे, पोलीस कॉन्सटेबल सचिन चंदन, अमित छडीदार यांच्या पथकाने केली.

इतर बातम्या

मुख्याध्यापक मोदींना १,५०,००० लाच घेताना रंगेहाथ पकडले

घरच्यांच्या विरोधाला झुगारत ती बनली पहिली महिला वैमानिक

आता व्हॉट्सअॅप स्टेट्स वरील व्हिडीओ करता येणार डाउनलोड