कनिष्ठ अभियंत्याकडे आढळली १२ लाखांची बेकायदा मालमत्ता

ठाणे : पोलीसनामा आॅनलाइन – पालघर येथील ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या वर्ग ३ च्या कनिष्ठ अभियंत्याकडे तब्बल १२ लाख रुपयांची अपसंपदा आढळली आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने या अभियंत्याविरुद्ध विक्रमगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

प्रज्वल नरेंद्र भोईर (वय ३६, रा. कनिष्ठ अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद, ठाणे वर्ग ३) असे या अभियंत्याचे नाव आहे.

ठाणे जिल्हा परिषदेत कनिष्ठ अभियंता वर्ग ३ असलेले प्रज्वल भोईर यांच्याविरुद्ध त्यांनी उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता जमविल्याचा आरोप करणाऱ्या तक्रारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आल्या होत्या. त्यानुसार अगोदर गुप्त चौकशी करण्यात आली. त्यात तथ्य आढळल्याने उघड चौकशी केली गेली. त्यांना सेवा काळातील परिक्षण कालावधीत सर्व प्रकारच्या उत्पन्नापेक्षा सर्व खर्च वजा करुन शिल्लक राहिल. त्यापेक्षा १६.२५ टक्के मालमत्ता अधिक आढळून आली. त्यांना १२ लाख ६ हजार २३५ रुपयांच्या उत्पन्नाचे स्त्रोत देण्यास सांगण्यात आले होते. परंतु, ते तो देऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी ही मालमत्ता भष्ट मार्गाने संपादित केली असल्याचे निष्पन्ना झाले.

त्यावरुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक सुदेश वसंत आजगांवकर यांनी विक्रमगड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून प्रज्वल भोईर याच्याविरुद्ध अपसंपदा बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नोकरीचं अमिष दाखवून जोडप्यानं केली १० लाखाची फसवणूक