‘त्या 12 आमदारांचा प्रस्ताव सरकारच्याच विचाराधीन ! नेमकी भुताटकी कुठे झाली आहे?’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन –   राज्यात अनेक मुद्यांवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या (mlas) नियुक्तीवरून भाजप आणि सत्ताधारी यांच्यामध्ये सातत्याने कलगीतुरा पाहायला मिळत आहे. राज्यपालांकडे 12 जणांची नावे पाठवली आहेत, मात्र राज्यपाल दिरंगाई करत असल्याची टीका आघाडी सरकारकडून करण्यात येत आहे. आमदारांच्या (mlas) नियुक्तीच्या मुद्द्यावरुन भाजपने आरटीआयच्या उत्तराचा हवाला देत महाविकास आघाडी सरकारवर हल्ला चढवला आहे. तसेच राज्यपालांवर टीका करणाऱ्या संजय राऊत यांना भाजपने सवाल विचारला आहे.

COVID-19 and Children : कोरोनाच्या तिसर्‍या लाटेपासून तुमच्या मुलाला वाचवायचे असेल तर त्याच्या डाएटमध्ये करा ‘या’ 7 गोष्टींचा समावेश

मागील काही महिन्यांपासून राज्यपाल कोट्यातून नियुक्त करण्याच्या 12 आमदारांच्या प्रस्तावावरुन राज्य सरकारमधील मंत्री आणि तिन्ही पक्षांचे नेते राज्यपालांवर निशाणा साधताना दिसत आहेत.
काही दिवसांपूर्वी राजभवनातून 12 जाणांची नावं असलेली फाईल गायब झाल्याची माहिती समोर आली होती.
या सर्व प्रकरणाला आता नवीन वळण मिळताना दिसत आहे. भाजपचे प्रमुख प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट केले आहे. यामध्ये मुख्यमंत्री सचिवालयाकडून एका आरटीआयला दिलेलं उत्तर जोडण्यात आले आहे.

केशव उपाध्ये यांनी हे पत्र ट्विट करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत.
त्या 12 आमदारांचा प्रस्ताव विचाराधीन मुख्यमंत्री कार्यालयाचे माहिती कायदा अंतर्गत उत्तर प्रश्न होता-प्रस्ताव कधी पाठवला ? कोणती नावे पाठवली ? काही उत्तर आले का ? हा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे सांगितले आहे.
मात्र, आता संजय राऊत नेमकी भुताटकी कुठे झाली आहे ? असा प्रश्न उपाध्ये यांनी विचारला आहे.

उपाध्ये म्हणाले, कारण हा प्रस्तावच अजून विचाराधीन आहे. सोमेश कोळगे यानी ही माहिती आरटीआय अंतर्गत विचारली होती. आता खुलासा व्हायला पाहिजे… पूर्वी ठरलेली नाव बदलण्याचा प्रस्ताव आहे का ? तिन्ही पक्षांचा कोटा बदलतोय का ? मुख्यमंत्री मंत्रालयातच जात नसल्याने विचार पूर्ण झाला नाही का ? असे प्रश्न उपाध्ये यांनी ट्विटच्या माध्यमातून विचारले आहेत.

बाबा रामदेव यांचा अ‍ॅलोपॅथीनंतर आता ज्योतिषांवर निशाणा, म्हणाले…

RTI ला मुख्यमंत्री सचिवालयाचे उत्तर

विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या नियुक्ती संदर्भात राज्यपालांना पाठवलेल्या पत्राची प्रत आणि राज्यपालांकडून देण्यात आलेलं उत्तर.

यासंदर्भातील माहिती सोमेश कोळगे यांनी माहिती अधिकारात मागितली होती. यावर प्रस्तुत प्रकरण विचाराधीन असल्यामुळे सद्य:स्थितीत माहिती उपलब्ध करुन देऊ शकत नाही, असं उत्तर मुख्यमंत्र्यांच्या सचिवालयाकडून देण्यात आले आहे.