Coronavirus : महाराष्ट्रात ‘हाहाकार’ ! सांगलीत एकाच कुटुंबातील 12 जणांना ‘कोरोना’ची लागण, राज्यातील आकडा 147 वर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – कोरोना व्हायरसने संपुर्ण जगात थैमान घातलं आहे. देशात आतापर्यंत 724 जणांना कोरोना व्हायरसची लागण झत्तली असून 17 जणांचे बळी गेले आहेत. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता 147 वर पोहचली आहे. आताच आलेल्या माहितीनुसार सांगली जिल्हयातील एकाच कुटुंबातील12 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे.


महाराष्ट्राच्या आरोग्य विभागानं त्याबाबत एएनआय वृत्तसंस्थेला माहिती दिली आहे. सांगतील एकाच कुटूंबातील चौघांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर पुन्हा 5 रूग्ण आढळले. आता त्यामध्ये आणखी 12 जणांची भर पडली आहे. मुंबई पाठोपाठ पुण्यात आणि आता सांगलीत कोरोनानं थैमान घातलं आहे.