अहमदनगर : जिल्ह्यात नवीन 12 पोलिस ठाण्यांचा प्रस्ताव

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – नगर जिल्ह्यात नवीन 12 पोलिस ठाणी व 6 उपविभागीय कार्यालयांचा प्रस्ताव पोलिस महासंचालक कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे. जिल्ह्याची परिस्थिती लक्षात घेऊन हे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
राज्यभरातील पोलिस स्टेशन, उपविभागीय कार्यालयांची पूर्नरचना करण्याचा निर्णय राज्याचे पोलिस महासंचालकांनी घेतला आहे. त्यानुसार नव्याने करण्यात येणाऱ्या पोलिस स्टेशनचे, उपविभागीय कार्यालयांचे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. सध्या जिल्ह्यामध्ये सात पोलिस उपविभागीय कार्यालये आहेत. तर सायबर पोलिस स्टेशनसह ३१ पोलिस स्टेशन आहेत.
सध्या संगमनेर, शिर्डी, श्रीरामपूर, नगर शहर, नगर ग्रामीण, कर्जत ही सात उपविभागीय अधिकारी कार्यालये आहेत. या कार्यालयांची पूर्नरचना करून एका उपविभागीय कार्यालयात दोन किंवा तीन पोलिस स्टेशन येतील, असे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. त्यानुसार शहरात सध्या केवळ एक उपविभागीय कार्यालय असून, त्याचे विभाजन करून कोतवाली उपविभागीय कार्यालय नव्याने तयार करण्यात येईल. तसेच नेवासा, राहुरी, अकोले, श्रीगोंदा, शिर्डी शहर असे उपविभागीय कार्यालयांचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे पोलिस उपअधीक्षक यांची संख्या वाढून त्यांना प्रभावीपणे काम करता येणार आहे. हे प्रस्ताव पोलिस महासंचालक कार्यालयाकडून गृहविभागाला दिले जाणार आहेत. त्यानंतर गृहविभाग प्रस्तावावर निर्णय घेणार आहे.
शिर्डी कार्गो विमानतळ पोलिस स्टेशनचा प्रस्ताव –

सध्या नगर शहरात कोतवाली, तोफखाना, भिंगार कॅम्प तीन पोलिस स्टेशन आहेत. त्यात तोफखाना पोलिस स्टेशनचे विभाजन करून सावेडी, कोतवाली पोलिस स्टेशनचे विभाजन करून केडगावला स्वतंत्र पोलिस स्टेशन करण्याचा प्रस्ताव आहे. तर शेवगावमधील बोधेगाव, पाथर्डीतील खरवंडी कासार, शिर्डीमध्ये शिर्डी कार्गो विमानतळ नावाने पोलिस स्टेशनचा प्रस्ताव, अकोले तालुक्यातील कोतूळ, समशेरपूर येथे, राहुरीतील देवळालीप्रवरा, जामखेडमधील खर्डा, कर्जतमधील मिरजगाव, पारनेरला टाकळी ढोकेश्वर येथे पोलिस स्टेशन होण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like