ठाणे सिव्हिल हॉस्पिटलमधील 12 परिचारिका ‘कोरोना’ बाधित

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयातील एका परिचारिकेला कोरोनाची लागण झाली होती. तिच्या संपर्कात आलेल्या आणखी ११ परिचारिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

दीड महिन्यांपूर्वी सिव्हिल रुग्णालयात पूर्णत: कोवीड -१९ रुग्णांसाठी राखीव करण्यात आले आहे. येथील एका परिचारिकेमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने तिची चाचणी करण्यात आली. तेव्हा ती पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे तिच्या संपर्कात असलेल्या सर्व ११ परिचारिकांचे नमुने घेण्यात आले. ते सर्वच्या सर्व पॉझिटिव्ह आले. त्यामुळे या रुग्णालयात एकच खळबळ उडाली आहे. या अहवालानंतर रुग्णालयातील सर्व इतर २२ परिचारिकांचे स्वॅब नमुने घेण्यात आले आहे. मात्र त्यांचे अहवाल अजून आलेले नाही.

एखाद्या जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांमध्ये कोरोनाची लागण इतक्या मोठ्या प्रमाणावर होण्याची ही पहिलीच वेळ आहे. संसर्गाबाबत पुरेशा प्रशिक्षणाअभावी हे घडले असल्याचे बोलले जात आहे. या घटनेमुळे जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी इतके काय तपासणीसाठी येणार्‍या संशयितांमध्येही घबराट पसरली आहे.