चिंताजनक ! ३ वर्षात १२  पोलीस नोकरी सोडून अतिरेकी बनले

श्रीनगर : वृत्तसंस्था 

जम्मू-काश्मीरमध्ये नोकरी सोडून अतिरेकी झाल्याच्या घटनांनी पोलीस विभागाची चिंता वाढवली आहे. गेल्या ३ वर्षांत १२ पोलीस सुमारे ३० शस्त्रांसह फरार  झाले आहेत. अलीकडेच पोलीस अधिकारी आदिल बशीर असेच पसार झाल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण गांभीर्याने घेत जम्मू-काश्मीर पोलिसांनी असा प्रकारच्या घटनांसंदर्भात एक विभागांतर्गत अहवाल तयार केला आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’5ec4df10-cae2-11e8-b7b1-4ddd472de280′]

हे पोलीस बनले अतिरेकी –

बशीर काश्मीरमधील  वाची विधानसभा मतदारसंघाचे आमदार एजाज मीर यांच्या निवासस्थानाहून ८ शस्त्र घेऊन फरार झाला होता.

पोलिसांनी ५ ऑक्टोबरला २९ वर्षीय बीएसएफ कॉन्स्टेबल शकीर वानीला आणखी एका स्थानिक तरुणासह हिजबुल मुजाहिद्दीनसोबच्या कथित संबंधांच्या आरोपाखाली अटक केली होती. पोलिसांच्या माहितीनुसार, वानी हा हिजबुल मुजाहिद्दीनचा भूमिगत कार्यकर्ता आहे आणि तो अतिरेक्यांना रसद पुरवण्यात मदत करतो. तसंच मिलिटंट रँकसाठी तरुणांच्या भरतीची जबाबदारीही त्याच्यावर सोपवण्यात आली होती.

पाकिस्तानला माहिती पुरवणाऱ्या आयएसआय एजंटला नागपुरात अटक

नोकरी सोडून पसार झालेल्या कॉन्स्टेबल रशीद शिगन प्रकरणात नवी माहिती जम्मू काश्मीर पोलिसांना मिळाली आहे. “रशीद हा हिजबुल मुजाहिद्दीनचा एक सक्रीय सदस्य होता. तसंच पोलीस खात्यातील नोकरीदरम्यान मागील १८  महिन्यांमधील किमान १३ अतिरेकी हल्ल्यात तो सामील होता,” असा दावा पोलिसांनी केला आहे.

पोलिसांपुढील आव्हाने –

 

“पोलिस कर्मचाऱ्यांना आपल्या भावना नोकरीपासून दूर ठेवणं कठीण आहे, विशेषत: जेव्हा कर्मचाऱ्याने अनेकवेळा वैयक्तिकरित्या त्या परिस्थितीचा सामना केलेला असतो. सध्या पोलीस विरुद्ध अतिरेकी असं चित्र दिसतं. पण पोलीस कर्मचाऱ्यांना स्वत: मध्येही एका आव्हानाचा सामना करावा लागत आहे,” असं एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं.

[amazon_link asins=’B0784D7NFX,B0756RF9KY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9cd89855-cae2-11e8-9e09-b9bcf0b003a3′]