शिरुर तालुक्यातील 12 गावे 7 दिवसांसाठी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात कोरोना रूग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शिरूर तालुक्यातील १२ गावे ०३ एप्रिल २०२१ ते ०९ एप्रिल २०२१ या कालावधीत ७ दिवसांसाठी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असल्याचे आदेश उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.

कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा १४, शिरसगाव काटा १२, न्हावरा ३५,आंबळे ६,चिंचणी १०, आंधळगाव ११, निमोणे ९, टाकळी हाजी १६, आमदाबाद फाटा ९, निमगाव म्हाळुंगी १५, पाबळ १४ ,जातेगाव बुद्रुक १६, ही १२ गावे ७ दिवसांसाठी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असून, वरिल गावांतील ठिकाण केंद्रस्थानी धरुन ५ किलोमीटर परिसर हा बफर क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येणार आहे.

सदर कालावधीत फक्त आत्यवश्यक बाबी म्हणून किराणा दुकाने, वैद्यकीय आस्थापना, दुध संकलन केंद्र, बँका, खताची दुकान चालू राहणार आहे.तसेच शेती विषयक सर्व कामे सामाजिक नियमांचे पालन करून सुरू राहणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्या आदेशानुसार शिरुरच्या तहसिलदार लैला शेख यांनी दिली आहे. नागरीकांनी कोरोना नियमांचे पालन करावे, मास्कचा वापर करावा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे.नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा शिरुरच्या तहसिलदार लैला शेख यांनी दिला आहे.