आषाढी वारीसाठी निघालेल्या सायकल दिंडीतील १२ वर्षाच्या मुलाला ट्रकने चिरडले

सिन्नर : पोलीसनामा ऑनलाइन – आषाढी वारीसाठी नाशिकमधून शुक्रवारी (दि.२८) सकाळी सायकल वारी निघाली होती. काही किलोमीटर गेल्यानंतर सायकल वारीत सहभागी झालेल्या १२ वर्षाच्या मुलाला एका भरधाव ट्रकने धडक दिली. यामध्ये मुलगा ट्रकच्या चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू झाला. प्रेम निफाडे असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

सिन्नर सायकलिस्ट असोसिएशनचे काही जण आषाढी वारीसाठी पंढरपूला सायकलवर जात होते. यामध्ये प्रेम आणि त्याचे आई-वडील देखील सहभागी झाले होते. चहापानासाठी थांबले असता भरधाव वेगात जाणाऱ्या ट्रकने प्रेमला धडक दिली. यामध्ये तो ट्रकच्या चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले.

या दुर्दैवी अपघातामुळे सायकल वारीच्या आनंदवार विरजण पडले. प्रेमच्या अचानक जाण्यामुळे त्याच्या आई-वडीलांना मानसिक धक्का बसला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

ससून रूग्णालयात ‘कोडा’वर अधुनिक वैद्यकीय व सर्जिकल उपचार उपलब्ध

‘ट्रॉमेटिक ब्रेन इंज्युरी’मुळे रूग्ण जाऊ शकतो ‘कोमात’ , ही आहेत लक्षणे

रोज एक कप ‘कॉफी’ प्या आणि ‘मधुमेह’ कंट्रोलमध्ये आणा

मराठा समाज सर्वोच्च लढाईसाठी तयार, विनोद पाटील यांनी दाखल केले ‘कॅव्हेट’

युती सरकारला धनगर समाजाला आरक्षण द्यायचंच नाही : धनंजय मुंडे

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like