यात्रेतील ‘डान्स’ पाहण्यासाठी गेलेल्या १२ वर्षीय मुलीवर ‘सामुहिक’ बलात्कार, ‘नग्न’ अवस्थेत आढळला मृतदेह

अररिया (बिहार) : वृत्तसंस्था – आजीसोबत जत्रेत नृत्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी गेलेल्या १२ वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर सामुहीक अत्याचार केल्याचा धक्कादाय प्रकार बिहारमधील अररिया जिल्ह्यात घडला आहे. जत्रेच्या ठिकाणापासून ५० मिटर अंतरावर मुलीचा नग्न अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने हा प्रकार उघडकीस आला. या घटनेमुळे ग्रामस्थांकडून संताप व्यक्त करण्यात येत असून याप्रकरणात पोलिसांनी एकाला अटक करण्यात आली आहे. तर तीन आरोपी फरार आहेत.

मेले में नाच देखने गई थी 12 साल की मासूम, न‍िर्वस्त्र म‍िली लाश

प्रिया असे खून करण्यात आलेल्या चिमुलकीचे नाव आहे. ती छतापुर येथील रहिवाशी आहे मात्र बालपणापासून ती अररिया जिल्ह्यातील मिर्जापूर येथे आपल्या आजी सोबत रहाते. सोमवारी रात्री ती आजीसोबत जत्रा आणि नृत्याचा कार्य़क्रम पहाण्यासाठी गेली होती.

मेले में नाच देखने गई थी 12 साल की मासूम, न‍िर्वस्त्र म‍िली लाश

नृत्याचा कार्य़क्रम पहात असताना ती अचानक बेपत्ता झाली. नात बेपत्ता झाल्याचे समजात तिच्या आजीने सर्वत्र तिचा शोध घेतला. दरम्यान या घटनेची माहिती ग्रामस्थांना मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी देखील तिचा शोध घेतला. मात्र, ती सापडली नाही.

मेले में नाच देखने गई थी 12 साल की मासूम, न‍िर्वस्त्र म‍िली लाश

मंगळवारी सकाळी यात्रेच्या ठिकाणापासून ५० मीटर अंतरावर प्रियाचा मृतदेह नग्न अवस्थेत आढळून आला. ग्रामस्थांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

मेले में नाच देखने गई थी 12 साल की मासूम, न‍िर्वस्त्र म‍िली लाश

ग्रामस्थांनी श्वान पथकाला पाचारण करण्याची मागणी केल्यानंतर पोलिसांनी सायंकाळी श्वान पथकाला पाचारण केले. घटनास्थळी पडलेल्या चप्पलवरून श्वान पथकाने जवळच्या गावाचा मार्ग दाखवला. पोलिसांनी याप्रकरणात एकाला अटक केली आहे तर त्याचे तीन साथीदार फरार आहेत.

आरोग्यविषयक वृत्त