काय सांगता ! पुण्यात चक्क बालविवाह, आई-बापानं अल्पवयीन मुलीचं लावलं लग्न

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – शिरूर तालुक्यात आई-वडीलांनी आपल्या 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अल्पवयीन मुलीच्या मामाने पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे. मामाने आई-वडील आणि नवऱ्या मुला विरोधात शिक्रापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी आई-वडील आणि नवऱ्या विरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास उस्मानाबाद पोलिसांकडे वर्ग केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शिरुर तालुक्यातील कासारी येथे कामानिमित्त वास्तव्य करणाऱ्या एका दाम्पत्याने आपल्या 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा विवाह उस्मानाबाद येथील 25 वर्षीय युवकासोबत लावून दिला. हा विवाह एका मंदिरात लावून दिल्याची तक्रार मुलीच्या मामाने पोलिसांकडे केली आहे.
सोलापूर जिल्ह्यातील हनुमंत कदम आणि सविता कदम यांची उस्मानाबद जिल्ह्यातील प्रवीण मते यांच्य़ाशी ओळख झाली. त्यानंतर जुलै महिन्यामध्ये कदम दाम्पत्याने आपली मुलगी 12 वर्षांची असल्याचे माहित असताना देखील तिचे लग्न प्रविण सोबत ठरवले. त्यानंतर या दोघांचा विवाह कळंब येथील एका महादेवाच्या मंदिरात लावून दिले. काही दिवसांपूर्वी प्रवीणने मुलीच्या आई-वडीलांना पैसे उसने दिले होते. पैसे परत न केल्याने त्याने मुलीच्या आई-वडीलांना मारहाण केल्याची माहिती मुलीने मामाला फोन करू दिली होती.

मुलीचा मामा विनोद कोरडे (रा. गौर. ता. कळंब, जि. उस्मानाबाद) यांनी घडलेला प्रकार शिक्रापूर पोलिसांना सांगितला. यानंतर पोलिसांनी अल्पवयीन मुलीचे वडील हनुमंत कदम आई सविता कदम (दोघे रा. नारी, ता. बार्शी), नवरा मुलगा प्रवीण मते, त्याचे वडील लहू मते, आई मंगल मते यांच्यावर गुन्हा दाखल करून पुढील कारवाईसाठी हा गुन्हा उस्मानाबाद पोलिसांकडे वर्ग केला आहे.

आरोग्यविषयक वृत्त –